
Shirdi Sai Baba Temple News: श्रीसाईबाबांचा १०७वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. या पुण्यतिथी उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी आंध्रप्रदेशातील एका भाविकाने बाबांच्या चरणी तब्बल १ कोटींचा हार अर्पण केला आहे. नाव गुप्त ठेवण्याची विनंती करत आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) एका अज्ञात साईभक्ताने तब्बल ९४५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.
याच अपार श्रद्धेपोटी भाविक साईचरणी मुक्त हस्ताने दान (Donation) अर्पण करतात. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी, शिर्डीत पुन्हा एकदा श्रद्धेचे एक मोठे उदाहरण पाहायला मिळाले. आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) एका अज्ञात साईभक्ताने तब्बल ९४५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.

हा सुवर्ण हार केवळ वजनीच नाही, तर अत्यंत आकर्षक नक्षीकाम (Intricate Design) केलेला असून तो नवरत्नांनी (Nine Gems) सुसज्ज आहे. या भव्य हाराची बाजारपेठेतील किंमत तब्बल १ कोटी २ लाख ७४ हजार ५८० रुपये (₹1,02,74,580) इतकी मोठी आहे. हा आकर्षक आणि मौल्यवान हार संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांना अर्पण करण्यात आला. विशेष म्हणजे, देणगीदार साईभक्ताने स्वतःच्या विनंतीनुसार आपले नाव गुप्त ठेवले (Name Kept Confidential) आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world