
सुनील दवंगे, शिर्डी: शिर्डीमधील साईबाबा मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविक साईनगरीत दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या गर्दीमुळे साईनगरीमध्ये वाहतूक कोंडी तसेच पार्किंगचा मोठा प्रश्न उभा राहतो. यावर आता साई बाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की. शिर्डीला साई दर्शनासाठी आपली वाहन घेवून येणा-या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे.. साई संस्थानच्या वतीनं साडे चार एकर जागेवर साडेचारशे वाहन पार्क होतील असं सुसज्ज वाहनतळ उभारल गेलय.. साईबाबा संस्थानच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या मोफत पार्कींग सुविधेचा औपचारीक शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते करण्यात आला आहे.
मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात; आझाद मैदानावरुन मोठं आवाहन
पार्कींगमुळे भाविकांची मोठी सोय होणार असून या ठिकाणाहून मंदिरामध्ये जाण्यासाठी संस्थानच्या वतीने बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वच्छतागृह, हायमॅक्स तसेच भाविकांना थांबण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी मंत्री विखे पाटलांनी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world