'अजितदादा म्हणाले, तुमच्यासाठी काय घर विकू", आशा वर्करने पगारवाढीबाबत सुप्रिया सुळेंसमोर मांडली व्यथा

आमची मुले शिकलेले आहेत, त्यांना नोकरी हवी आहे. दुष्काळात मुलं आत्महत्या करत आहेत. कारण त्यांचे आई-वडील गरीब आहे. त्यांच्यावर कर्ज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे

'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांचे 3000 रुपये अनेक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार जोमाने सुरु आहे.  मात्र एका आशा सेविकेने आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर पगारवाढ द्या, अशी मागणी केली आहे. शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (राशप) खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासमोरच या महिलेने ही मागणी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आशा सेविकेने म्हटलं की, आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पगारवाढीचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याबाबतचा जीआर अजूनही निघालेला नाही. आता अजितदादा म्हणातायेत तुमच्यासाठी काय माझा घर विकू. आम्हाला हे 1500 रुपये नको. कोरोना काळात आम्ही खूप काम केले. तेव्हा जवळचे नातेवाईक, शेजारी कुणीही जवळ यायचे नाहीत. आशा सेविका, आशा सुपरव्हायझर, अंगणवाडी सेविका आम्ही घरोघरी जायचो. आमचंही कुटुंब होतं. मात्र आम्हाला अधिकाराने सांगायचे की हे तुम्हाला करावं लागेल. 

(नक्की वाचा-  महायुतीत फूट? भाजपकडून काळे झेंडे तर शिंदे गटाचा बहिष्कार; मित्रपक्ष अजित पवारांवर नाराज का?)

त्यानंतर आमची पगारवाढी केली, मात्र त्याचा जीआर तर काही काढला नाही. आता म्हणत आहेत की तुमच्या पगारासाठी काय आमचे घर, जमीन विकू. आम्हाला ते लाडक्या बहिणीचे 1500 रुपये नको. कारण आम्ही भरलेल्या टॅक्सचेच पैसे तुम्ही आम्हाला देत आहात, असं या आशासेविकेने म्हटले. 

(नक्की वाचा-  'पु्न्हा सरकार आलं तर महिलांना 90 हजार रुपये देऊ'; अजित पवारांचं महिलांना मोठं आश्वासन)

आमची मुले शिकलेले आहेत, त्यांना नोकरी हवी आहे. दुष्काळात मुलं आत्महत्या करत आहेत. कारण त्यांचे आई-वडील गरीब आहे. त्यांच्यावर कर्ज आहे. मुले शिकलेली आहेत, मात्र त्यांच्याकडे नोकरी नाही. त्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत. बेरोजगार मुलांना तुम्ही नोकरी द्या, अशी अपेक्षा देखील या आशा सेविकेने व्यक्त केली. 

Advertisement