सुनील कांबळे, लातूर
स्मशानभूमीची नसल्याने संपप्त नागरिकांना राज्य महामार्गावरच मृतदेहावर अंतिम संस्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाढी येथे ही घटना घडली आहे. बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीची जागा नसल्याने नागरिकांनी हा पवित्रा घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बौद्ध समाजातील लोकांनी प्रशासनाच्या विरोधात लातूर-उदगीर मार्गावर रास्तो रोको करत अंत्यविधी केला. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी हे गाव येरोळ ग्रामपंचायत हद्दीत येत असून येरोळ ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील पांढरवाडी, हणमंतवाडी आणि जांभळवाडी आदी गावांचा या ग्रूप ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो.
(नक्की वाचा: 'मविआ'ला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता; केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला लागू होणार?)
या तिन्ही गावांना बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने या गावात बऱ्याच दिवसांपासून अशा प्रकारचे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाच्या दुटप्पी धोरणाचा फटका बौद्ध समाजातील बांधवांना बसत आहे. त्यामुळेच येथील चिडलेल्या समाजबांधवांनी पांढरवाडीच्या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- गगन भरारीचं स्वप्न अपघाताने संपवलं; भीषण अपघातात 2 पायलटचा मृत्यू, दोघे गंभीर)
संतप्त नागरिकांनी कायमस्वरुपी स्मशानभूमीची मागणी करत चक्क राज्य महामार्ग क्रमांक 145 वरच तहसील व पोलीस प्रशासनाच्या समोर रस्त्यावर मृतदेहाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. हा अंत्यसंस्कार उदगीर-लातूर रस्त्यावर केल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.