देवा राखुंडे , पुणे: इंदापूर तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडीजवळ चार चाकी गाडीचा भीषण अपघा झाला. या अपघातामध्ये दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ पायलटच्या चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन शिकाऊ पायलटचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा: 'मविआ'ला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता; केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला लागू होणार?
दशु शर्मा (वय वर्ष 21) आणि आदित्य कणसे (वय वर्ष, 29) अशी मृतांची नांवे आहेत तर कृष्णा मंगलसिंग (वय वर्ष 21) व महिला पायलट चेष्टा बिश्नोई वय (वर्ष 21 वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बारामती भिगवण मार्गावर लामजेवाडी गावानजिक आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या हा अपघात घडला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही भयंकर घटना घडली.
टाटा हॅरिअर या गाडीमधून हे चौघेजण बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते. कृष्णा मंगल सिंग हा गाडी चालवत होता. यावेळी लामजेवाडी गावाजवळ भरधाव कारवरील निमंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकली त्यानंतर बारामती एमआयडीसी ला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन वर पलटी झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यामध्ये एक महाराष्ट्रातील पायलट असून बिहार राज्यातील एक तर राजस्थानच्या एका युवतीचा ही समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world