
Ashadhi Ekadashi Maha Puja : आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांच्या भक्तांचा महापूर आलेला दिसून येतो आहे. प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरवरून एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होत आहे. आज पहाटे 2.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. फडणवीसांना सहाव्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिव्यजा फडणवीस उपस्थित होते.
यंदा आषाढी महापूजेचा मान कैलास दामू उगले (वय 52) आणि कल्पना कैलास उगले (वय 48) यांना मिळाला आहे. मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्याचे असलेले उगले कुटुंबीय यांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला आहे. कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते. विठुमाऊलीची पूजा करण्याचा मान मिळाल्याबद्दल दाम्पत्याने आनंद व्यक्त केला.
नक्की वाचा - Ashadhi Ekadashi Live Updates: चंद्रभागे तिरी वारकऱ्यांचा मेळा! 'विठुनामा'च्या गजराने पंढरी दुमदुमली
ते म्हणाले, आम्हाला फार आनंद झाला आहे. या पुजेमुळे आमचा आनंद द्विगुणीत झाली आहे. आमचा आनंद शब्दात न मांडण्यासारखा आहे. या आधीपर्यंत वर्षातून एकदा पंढरीच्या वारीला येत होतो. आता एक वर्षाचा मोफत एसटी प्रवासाचा प्रवास मिळाल्यामुळे प्रत्येक महिन्याची पंढरीची वारी करेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world