
6 जुलै आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरातील भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. आषाढीला अख्खी पंढरी दुमदुमून गेली होती. वारकऱ्यांनी पांडुरंगाचं दर्शन (Pandharpur Darshan) घेतलं. या दिवशी पंढरपुरात एक वेगळाच रंग चढला होता. दरम्यान पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
आषाढी वारी संपत असतानाच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. घरगुती वादाच्या कारणातून पत्नीने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तर पतीने घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आसबे कुटुंबातील चारही सदस्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिकचा तपास तालुका पोलीस करत आहेत.
नक्की वाचा - Pandharpur News : पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना अघटित घडलं, 51 वारकऱ्यांच्या एसटीचा भीषण अपघात
पंढरपुरात वारकऱ्याला मारहाण...
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur News) दाखल झालेल्या एका भाविकाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरच्या दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला पंढरपूर मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाकडून (Devotee beaten up in Pandharpur) मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला (Warkari Beaten up) मंदिराच्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. भाविकाला रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world