जाहिरात
2 hours ago

Maharashtra LIVE Updates: राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, पुण्यासह सातारा, रायगड जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे आषाढी एकादशीसाठी तुकोबा राया आणि माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी  सोहळा आपला दुसरा मुक्काम आटोपून  पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.

LIVE Updates: चंद्रभागेत बुडून भाविकाचा मृत्यू

आषाढी वारीच्या तोंडावर चंद्रभागेत बुडून भाविकांचा मृत्यू 

चंद्रभागातीरी आपत्कालीन यंत्रणा हवी सज्ज

चंद्रभागेत पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

बेळगाव मधील भाविक चंद्रभागा स्नानावेळी बुडाला..

शुभम ज्ञानेश्वर पावले ( वय २७) असे चंद्रभागेत बुडून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव 

तीन तासाचा शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह चंद्रभागेत सापडला..

LIVE Update: पालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी, ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक

आगामी महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज बैठक होणार आहे

सर्व खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुख या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत

काल शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला आणि आज ही बैठक घेतली जात आहे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी रणनीती काय असेल यावर चर्चा केली जाईल

त्यांचसोबत काल भाषणात उद्धव ठाकरेंनी जे जनतेच्या मनात आहे तेच होईल असं वक्तव्य युती संदर्भात केलं आहे

त्यामुळे नेमकं आमदार आणि खासदारांना या युती बद्दल नेमकं काय वाटतं आणि काय मत आहे हे देखील जाणून ते घेणार आहेत

LIVE Updates: बीडचे संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा शाळा प्रवेश

 बीडचे संतोष देशमुख यांच्या मुलासह  पुतण्याचा शाळा प्रवेश .

कुटुंबासह संतोष देशमुख यांचा मुलगा  विराज आणि पुतण्या सत्यजित सैनिक शाळेत दाखल

संतोष देशमुख यांच्या पत्नी,मुलगी,भाऊ व वाहिनेसह कुटुंब देखील उपस्थित.

गणवेशात दाखल झालेल्या विराज आणि सत्यजितव कुटुंबाचे आमदार खोतांसह शाळे कडुन करण्यात आले स्वागत..

झांज पथकाच्या निनादात आणि फुलांचा वर्षाव करत शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले स्वागत..

LIVE Updates: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दोन गटात वाद

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दोन गटात वाद 

कान्होबा ऊर्फ तांबोळ देवस्थान येथे आरती करण्यावरून दोन गटात धक्काबुक्की 

दोन्ही गटांना पोलिसांनी केले शांतता राखण्याचे आवाहन 

कान्होबा ऊर्फ तांबुळदेव देवस्थान येथे दोन समाजात गेल्या काही दिवसापासून धार्मिक विधी करण्यावरून वाद सुरु

एका गटातील काही तरुणांनी या देवस्थानच्या गाभाऱ्यात आरती करण्याचा प्रयत्न केला

मात्र दुसऱ्या गटातील तरुणांनी आरती करण्याला विरोध केला

त्यानंतर दोन गटात बाचाबाची होत धक्काबुक्की करण्यात आली

LIVE Updates: उजनी धरणात येतोय 70 हजार क्यूसिक्स इतका विसर्ग

उजनी धरण पुणे येथील पावसाने झपाट्याने भरत आहे. अशा परिस्थितीत सध्या उजनी धरणात दौंड येथून 70 हजार क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित होतोय. त्यामुळे पुढील 48 तासात धरण अधिक झपाट्याने भरेल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत उजनी धरणातून केव्हाही भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत उजनी धरण व्यवस्थापनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील भीमा काठावर पुराचे सावट उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.

LIVE Updates: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 3 जखमी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात.

मनोर जवळ वाडा खडकोना येथे उभ्या ट्रकला स्कार्पिओ कार ची धडक.

अपघातात  तीन जण जखमी एकाची प्रकृती गंभीर.. तर कारचा चक्काचूर..

महामार्गावर चुकीच्या पद्धतीने ट्रक उभी केल्याने झाला अपघात.

कार चालकाला उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागून दिली धडक

जखमींना उपचारासाठी मनोहर येथील खाजगी रुग्णालयात केलं दाखल

LIVE Updates: गजानन महाराज यांची पालखी आज बीडच्या परळीत दाखल

आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे बीड जिल्ह्यातील परळी येथे गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी परळी वैजनाथ येथील मान्यवरांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. पालखीमध्ये आलेल्या हजारो वारकरी भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्ताने जगमित्र नागा मंदिराने आज तीर्थक्षेत्राचे रूप धारण केले आहे. गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी परळी आणि परिसरातील हजारो भाविक जमले आहेत.

LIVE Updates: भरत गोगावले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न- तृप्ती देसाई

भरत गोगावले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न- तृप्ती देसाई

शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पूजा करताना चे फोटो व्हायरल झाले असून त्यांनी निवडणुकीआधी अघोरी पूजा केली असा आरोप केला जात आहे. बगलामुखी आणि बंगालमधून आलेल्या महाराजांनी ही पूजा घातल्याचा आरोप केला जातोय. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मात्र याला आक्षेप घेतलाय. भरत गोगावले राजकारणात आहे. त्यांना पालकमंत्री व्हायचे. त्यामुळे बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर अघोरी पूजेचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटलय..

LIVE Updates: मनसेची आज बैठक, हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाची दिशा ठरणार

मनसे ची आज बैठक...

मुंबईतील मनसे च्या विभागाध्यक्षांची आज ११ वाजता शिवतीर्थ येथील कार्यालयात बैठक

बैठकीत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनची पुढची दिशा ठरविण्यासाठी चर्चा होणार 

मनसेचे नेते मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक...

LIVE Updates: कोल्हापूर शहरात दूध चोरी करणारी टोळी सक्रीय

कोल्हापूर शहरात दूध चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पहाटे दूध वितरकांनी दरवाजाबाहेर ठेवलेल्या पिशव्या गायब होत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन स्कार्फ घातलेल्या महिलांची या परिसरात संशयास्पद हालचाल कैद झाली. त्यानंतर ही टोळी गंभीर प्रकार समोर आला आहे.. या दूध चोरी करणाऱ्या टोळीमुळे शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

LIVE Updates: खडकवासला धरण साखळीत 9.08 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीत एका दिवसात दीड टीएमसी पाणीसाठा वाढला

खडकवासला धरण साखळीत 9.08  टीएमसी पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 9.08 टीएमसी म्हणजे 31.15 टक्के पाणीसाठा जमा..

गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.57 टीएमसी म्हणजे 12.23 टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता.

म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध..

चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.सध्या पाणी साठा चांगला वाढला आहे.

खडकवासला 1.55 टीएमसी

पानशेत 2.67  टीएमसी

वरसगाव 4.40 टीएमसी 

टेमघर 0.47  टीएमसी

LIVE Updates: कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली

कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली

कोयना धरणात प्रतिसेकंद 51 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरु

कोयना धरणात 32.52 टीएमसी पाणीसाठा

धरणात गेल्या चोविस तासात 2 टीएमसी पाण्याची आवक

वाढत असलेल्या आवकमुळे कोयनेच्या पायथा विद्युतगृहातून पाण्याचा विसर्ग सुरु करणार

कोया धरण प्रशासनाचा निर्णय

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

LIVE Updates: जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा : आ. धर्मरावबाबा आत्राम

येत्या होउ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वतंत्र निवडणूका लढविणार असून जिल्हा परिषदेचे किमान 32 सदस्य निवडून आणण्यासाठी सोबतच नगर परिषद, पंचायत समितीवर आपली एकहाती सत्ता आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या...

LIVE Updates: पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट

पुण्यातील बाबा भिडे पुल गेला होता पाण्याखाली 

रात्री १५ हजार ९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आला होता 

पुलावर आत्ता सगळी जलपर्णी साचली असून रस्ते देखील सगळे जलमय झालेले  आहेत 

पुण्याला आज देखील रेड अलर्ट चा इशारा तर नदी काठच्या लोकांना सावधानगी बाळगण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे

LIVE Updates: माऊलींच्या पालखीचे आज पुण्याकडे प्रस्थान

आळंदीतील गांधी वाड्यातील रात्रीचा मुक्काम आटोपून  संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज आपल्या दुसऱ्या मुक्कामासाठी पुण्याकडे प्रस्थान ठेवेल. सकाळी 9 वाजताच्या सुमारास थोरल्या पादुका मंदिरात पालखीची पहिली आरती आणि सकाळचा विसावा असेल त्यानंतर  फुमेनगर येथे पालखी सोहळा दुपारचा विसावा घेऊन  संध्याकाळी 4 च्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल होईल. त्यानंतर भवानी पेठेतील मंदिरात या सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असेल 

LIVE Updates: मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कॉन्फरन्सचे आयोजन

नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्यावतीने उद्या 22 जून रोजी मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.त्याची तयारी पूर्ण झाली असून उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 1 हजार निमंत्रित सदस्यांना कॉन्फरन्सचे निमंत्रण देण्यात आले आहे.शासनस्तरावर वक्फ दुरुस्ती कायदा,मशिदींवरील भोंगे, बनावट जन्म दाखला, बांगलादेशी / रोहिंग्या यासह विविध कारणांनी अल्पसंख्यांक समाजावर अन्याय केला जात भावना अल्पसंख्यांक समाजात  असून त्या संदर्भात या कॉन्फरन्समध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com