जाहिरात
39 minutes ago

Maharashtra LIVE Blog: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती. यंदा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शनासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दादर येथील स्मृती स्थळावर फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एका मंचावर येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे बंधु एकत्र येतील. मुंबई महानगरपालिका निवडणुका तसेच कल्याणमध्ये मनसेने शिंदेंना साथ दिल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे आमने- सामने येतील. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Beed LIVE Update: बीडच्या नाथापूर मध्ये दोन गटात दगडफेक आणि हाणामारी

बीडच्या नाथापुरमध्ये रात्री उशिरा जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले होते. यामध्ये एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणी दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

PCMC LIVE Update: शिरूर मधील पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरात दानपेटी चोरी; सीसीटीव्हीत चोरटे कैद

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती जवळ असणाऱ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथील श्री सोमेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली. ही चोरी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दानपेटीतील रकमेचा अंदाज घेतला जात असून परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Buldhana LIVE Update: एसटी चां मोठा अपघात टळला, 30 प्रवासी बचावले

बुलढाणा– धाड मार्गावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्याखाली उतरून थेट शेतात शिरली.. वरुड – सोयगाव – जामठी मार्गावरील बस क्रमांक MH 20 BL 1806 ही बस  अपघातात अनियंत्रित झाली होती.. सुदैवाने बसमधील सुमारे ३० प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.. मात्र या घटनेनंतर एसटीच्या जुन्या तसेच भंगार बसेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे....

Maharashtra LIVE Update: आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीष दरोडा यांचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीष दरोडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळ्याप्रकरणी हरीष दरोडा यांच्यावर डिसेंबर २०२३ मध्ये किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर ९ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी हरीष दरोडा यांना अटक केली होती. अटकेनंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांना कल्याण येथील आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात असतानाच हरीष दरोडा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. 

LIVE Update: बदलापूरसारख्या घटनांना सरकार जबाबदार: सतेज पाटील

" बदलापूरसारख्या घटनांना सरकार जबाबदार आहे, राज्यात कायदाचा बोजवारा उडाला आहे.  या सगळ्या घटनांना सरकार जबाबदार आहे, अशा घटनेतील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक केलं जातं होतं, त्यामुळेच अशा घटना घडल्या जात आहेत,

 अशा प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढतं, स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असतात मग गृहखाते आपल्याकडे कशाला ठेवता?: काँग्रेस आमदार सतेज पाटील 

Thane LIVE Update: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केली गटस्थापना

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या  गटाची स्थापना केली आहे.  ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांची ठामपा गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. 

नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचे पत्र दिले. ठाणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे. 

Maharashtra LIVE Update: बांगलादेशच्या मुलींची प. बंगाल, आंध्र प्रदेशमार्गे शहरात तस्करी

छत्रपती संभाजीनगरात बांगलादेशातील दोन वीस वर्षाच्या मुलींची पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे शहरात तस्करी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघींची गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना शहरात का आणण्यात आले, याचा गुन्ह्यात उल्लेख नसल्याने त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यांना अवैधरीत्या हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी हॉटेलचालक आकाश नाना त्रिभुवन याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raigad Election LIVE Updates: महाड राडा प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोपी लवकरच महाड पोलिस ठाण्यात हजर होणार,

महाड नगर पालिका निवडणुकी दरम्यान राडा प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोपी लवकरच महाड पोलिस ठाण्यात हजर होणार, सूत्रांची माहिती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप, श्रेयस जगताप, सुशांत जाबरे, धनंजय देशमुख, निलेश महाडिक हे अद्यापही आहेत फरार

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे आरोपी कार्यकर्ते हजर होणार असल्याची माहिती

Pandharpur LIVEY Update: ढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

 वसंत पंचमीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. अनुराधा दीदी शेटे यांची स्वयंवर कथा झाल्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती एकमेकांसमोर आणण्यात आल्या. आंतरपाठ दोन्ही मूर्तीसमोर धरण्यात आल्या. आणि संपन्न झाला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा. या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. यासाठी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संपूर्ण मंदिरात विवाहाचे नेटके निगाजन केले होते. 

Ratnagiri LIVE Update: पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवाराचं निधन

पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवाराचं निधन

आपचे उमेदवार सुजीत सुर्वे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

संमगेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या धामणी गणातून होते उमेदवार

संगमेश्वर तहसिल कार्यालयाच्या बाहेरच आला त्यांना हृदयविकाराचा झटका

सजीत सुर्वे यांच्या सुचकाकडून उमेदवारी अर्ज मागे, त्यामुळे धामणी गणात निवडणुक होणार कि नाही याचा आज निवडणूक निर्णय अधिकारी देणार फैसला

Beed LIVE Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण! 7 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी संपली, 7 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी.

- आरोपीच्या वकिलांनी लॅपटॉप मधील डेटा कॉपीज मिळाल्या नाहीत त्या द्याव्यात अशी मागणी केली.

- सरकारी पक्षाने लॅपटॉप मधील डेटा मिळण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ लागेल असे सांगितले.

- गेल्या तीन तारखांपासुन लॅपटॉप डेटा कॉपीज दिल्या जात नसल्याने वारंवार तोच मुद्दा होत आहे उपस्थित.

- आरोपी विष्णू चाटे याच्या बीड जेलमध्ये ठेवण्यासंदर्भातील अर्जावर सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडले.

- आरोपीला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यासंदर्भातील अधिकार जेल प्रशासनाला असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे. 

- यावर पुढील सुनावणीत निर्णय दिला जाण्याची शक्यता. यापूर्वी विष्णू चाटे चा एक अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे.

LIVE Update: महाड मारहाण प्रकरण! विकास गोगावलेंसह 8 जण पोलिसांना शरण

विकास गोगावले यांच्यासह अन्य शिवसेनेचे आरोपी पोलिसांना शरण 

महाड पोलिस ठाण्याचे DYSP शंकर काळे यांची माध्यमांशी संवाद 

आम्ही पुढील तपास करत आहोत... आवश्यक बाबी तपासून कारवाई करू.. शंकर काळे 

शरण आलेल्या आरोपींपैकी 

विकास गोगावले 

महेश गोगावले 

विजय मालुसरे 

धनंजय मालुसरे 

प्रशांत शेलार 

वैभव मालुसरे 

सूरज मालुसरे 

सिद्धेश शेठ 

एकूण आठ आरोपींनी पत्करली शरणागती

Badlapur LIVE Update: बदलापूर ४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रयत्न प्रकरण

बदलापूर ४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रयत्न प्रकरण 

खाजगी व्हॅन वर RTO विभागाने केली कारवाई 

२४००० हजार दंड करत त्या व्हॅन चा परवाना केला रद्द

बदलापूर अत्याचार प्रकरणातील 'ती' व्हॅन अवैध

व्हॅनला आरटीओ परवानगी नसल्याची माहिती

खाजगी व्हॅनमधून अवैधरित्या केली जात होती विद्यार्थ्यांची वाहतूक

LIVE Updates: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसैनिकांकडून अभिवादन

 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज शिवसेना शाखा पणदूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेना सचिव दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, अरविंद करलकर, देवेंद्र नाईक यांच्यासहित शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LIVE Updates: अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद

* अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद; सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च....

* कोरोना काळात उभारले होते हे ऑक्सिजन प्लांट; दिवसाला 13,36 मॅट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता..

* ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यासाठी टेक्निशन आणि मनुष्यबळ न मिळाल्याने प्लांट बनले शोभेची वस्तू.

* पाच वर्षापासून एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला नाही... कोरोना काळात उभारण्यात आले होते हे ऑक्सिजन प्लांट...

LIVE Update: जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफर कडून पर्यटकावर हल्ला

- मुंबईच्या जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफर कडून पर्यटकावर हल्ला

- फोटोग्राफरच्या हल्ल्यात पर्यटक गंभीर जखमी

- फोटोग्राफर आणि पर्यटकांचा हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

- व्हायरल व्हिडिओची दखल घेत सांताक्रुझ पोलिसांकडून फोटोग्राफरची धरपकड

- मुंबईच्या जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी मोठ्या संख्यामध्ये वेगवेगळ्या भागातून पर्यटक येतात

- चौपाटीवर मोठा संख्येत असलेले अनधिकृत फोटोग्राफर पर्यटकांचे फोटो काढतात

- यावेळी काही फोटोग्राफरकडून पर्यटकांसोबत दादागिरी आणि हाणामारी करण्याच्या देखील घटना घडतात

- त्यामुळे जुहू चौपाटीवर दादागिरी करणारे फोटोग्राफर विरोधात कारवाई करण्याची पर्यटकांकडून मागणी केली जात आहे

Raigad LIVE Updates: विकास गोगावले पोलिसांना शरण

महाडमधील मारहाण प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर महाड पोलिसांना शरण आले आहेत. गेल्या महिनाभरापासून विकास गोगावले हे पोलिसांना गुंगारा देत होते. आता हायकोर्टाने झापल्यानंतर अखेर विकास गोगावले हे पोलिसांना शरण आले आहेत. 

LIVE Update: भाजपात कार्यकर्त्यांच्या नाराजीनाट्य, निष्ठावंतांचा घेतला जातोय बळी

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघात तिकीट न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुपने गटात गणेश पाटील, उंब्रज गटातून अँड महादेव साळुंखे आणि कोपर्डे गटातून किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीची उमेदवारीच कापली गेली आहे. याचा रोष कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि निवड समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

Maharashtra LIVE Update: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची लगीनघाई

 वसंतपंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी वाटेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. यासाठी संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आले आहे. सकाळपासूनच सनई चौघड्याचे सूर वाजत आहेत. अशातच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लग्नविधीसाठी हास दोन टन फुलांपासून मयूर मंडप उभा केलाय. पंढरपुरात देवाची लगीनघाई सुरू आहे.

Maharashtra LIVE Update: राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा: राज ठाकरे



Maharashtra LIVE Update: बाळासाहेबांनी महाराष्ट्रहिताशी तडजोड केली नाही: शरद पवार

LIVE Update: बाळासाहेब ठाकरेंची जयंती! मुंबईत मोठी बॅनरबाजी

शिवसेना पक्षाला घडवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवरी रोजी १००वी जन्म शताब्दी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मध्ये साजरी केली जाते.. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग महाराष्ट्र नाही तर अख्या देशात आहे. मध्यरात्री शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबई येथील रिगल जंक्शन वर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहे. तात्पुरती रिगल जंक्शन वर मोठ्या प्रमाणात बॅनर वॉर आपल्याला बघायला मिळत आहे,

Maharashtra LIVE Update: बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी, दादर येथील स्मृती स्थळावर फुलांची आरास

-यंदा स्व बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी 

 दादर येथील स्मृती स्थळावर फुलांची आरास

संभाजीनगर , पंढरपूर येथून शिवसैनिक बाबासाहेबांचे दर्शन घ्यायला

- KDMC येथे झालेल्या विषयानंतर आज दोन ठाकरे बंधू एकत्र येणा

Maharashtra LIVE Update: PM मोदींकडून बाळासाहेबांना आदरांजली

PM मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली..

Listen to the latest songs, only on JioSaavn.com