यशपाल सोनकांबळे, पुणे:
Ashadhi Wari 2026 Pune Pandhapur Traffic Changes: पुण्यामध्ये दोन दिवस मुक्काम केल्यानंतर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अवघड दिवे घाटातून सासवडला मार्गस्थ झाली आहे. तसेच संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाली आहे. दोन्ही पालख्यांचे प्रस्थान सुरळीत होण्यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मार्ग असलेल्या पुणे- पंढरपूर महामार्गावर मोठे बदल करण्यात आले आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून १० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ (पुणे–पंढरपूर/पुणे–बारामती मार्ग) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
MSRTC News: मुंबई-पुणे रेल्वे ठप्प! गैरसोय टाळण्यासाठी STचा मोठा निर्णय; प्रवास होणार सुपरफास्ट
वाहतुकीत कोणते बदल? जाणून घ्या पर्यायी मार्ग
जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण- बेलसर फाटाः- अ) १० जुलै रोजी रात्री २०ते १३जुलै रोजी सायं १७ वा. या वेळेत बारामती, फलटण, सातारा बाजुकडून येणारी पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन बेलसर फाटा- वाघापुर चौक - उरुळी कांचन मार्गे पुणे बाजुकडे वळवावी. (ब) १३ जुलै २०२६ रोजी सायं १७वा. ते १४ रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत जेजुरी, सातारा, फलटण, लोणंद, बारामती कडे जाणारी सर्व वाहतुक ही बेलसर-नाझरे कप-काळाओढा-मोरगाव-निरा-लोणंद-साताराकडे वळवावी.
मोरगाव चौक जेजुरी :- अ)१० जुलै रोजी रात्री २० वा. ते १२ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत निरा मार्गे पुणेकडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव -सुपा-कडेगाव चौफुला मार्ग पुणे बाजुकडे वळवायी. (ब)१४ जुलै रोजी दुपारी १३ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत पुणे सासवड मार्गे लोणंद सातारा फलटण कडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव-लोणी भापकर फाटा कोऱ्हाळे मार्गे फलटण बाजुकडे वळवावी.
भोरवाडी फाटा जेजुरी :- १४ जुलै रोजी दुपारी १३ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत पुणे सासवड मार्गे लोणंद सातारा फलटण कडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने कोळविहीरे-मोरगाव रोड-मोरगाव-लोणी भापकर फाटा कोऱ्हाळे मार्गे फलटण बाजुकडे वळवावी.
श्री. छत्रपती शिवाजी चौक निरा: १० जुलै रोजी रात्री २० वा. ते १५ जुलै रोजी रात्री २३ वा. यावेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणेकडे जाणेसाठी जेजुरी - सासवड बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक निरा-मोरगाव-सुपा केडगाव चौफुलामार्गे पुणे बाजुकडे वळवावी.
बेलसर गाव कोथळे चौक : अ) १० जुलै 26 रोजी रात्री २० वा. ते १३जुलै रोजी सकाळी ०५ वा. या वेळेत कोथळे चौक येथून सासवड बाजूकडे कोणत्याही प्रकारे वाहतुक सोडू नये. (ब)१३जुलै रोजी सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक बेलसर कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे काळा ओढा मोरगाव किंवा नाझरे- पांडेश्वर मार्ग सुपा मोरगाव अशी वळवावी.
पारगाव मेमाणे चौक जेजुरीः १२ जुलै रोजी सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक बेलसर कोथळे चौक कोथळे गाव- नाझरे काळा ओढा-मोरगाव किंवा नाझरे- पांडेश्वर मार्गे सुपा मोरगाव अशी वळवावी.
सुपा पोलीस स्टेशन, मोरगावः- सुपा पोलीस स्टेशन, मोरगाव चौक पुणे ग्रामीण १३ जुलै सकाळी ५ वा. ते १५ जुलै रात्री २३वा. पर्यंत निरा बाजुकडे जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे बंद करुन मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळवावी.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण १४ जुलै रोजी सकाळी ०५ ते १५ जुलै रात्री २३ वा. रोजी पर्यंत बारामती बाजुकडून निरा मार्गी लोणंद बाजुकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे बंद करुन निंबुत-मुरुम-काळज मार्ग लोणंद अशी वळवावी.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणः जेजुरी नाका सासवड : १) १३ रोजी रोजीचे सकाळी ०५ वा. ते १५ जुलै रोजी रात्री २३ वा. रोजीपर्यंत पुणे बाजुकडून जेजुरी मार्ग सातारा, फलटण बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड-नारायणपुर- कापूरहोळ मागे सातारा, फलटण किंवा सासवड-वीर फाटा परिंचे वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळवावी. (२) १३ जुलै सकाळी ०५:०० वा ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. रोजी पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे बारामती बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड - पारगाव मेमाणे- पिसर्वे-सुपा मार्गे बारामती अशी वळवावी.
Mumbai News: मॅनहोलच्या सर्व समस्यांबाबत BMC अॅक्शन मोडवर, 'या' WhatsApp नंबरवर पाठवा सर्व तक्रारी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world