- आषाढी वारीसाठी जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतून होणार आहे
- यंदा तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी राजस्थानमधील सिहोर गावातून आलेला नवीन रथ वापरला जाणार
- या रथासाठी तब्बल १५० घनफुट ब्रमटीक सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे
सूरज कसबे
Pune News: आषाढी वारीचे वेध आता वारकऱ्यांना लागले आहे. विठ्ठलाचे भक्त आतापासूनच तयारीला लागले आहे. पायीवारी करणारे वारकरी त्यासाठी सज्ज ही आहेत. वारीचा कार्यक्रमही ठरला आहे. त्यानुसार जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतून होणार आहे. यावेळी पालखीचे प्रस्थान होईल त्यावेळी काही तर खास असणार आहे. त्याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे.ही खास गोष्ट म्हणजे तुकोबांच्या पालखीसाठी नवीन रथ बवण्यात येत आहे. ही एक विशेष रथ असेल.
यावर्षी तुकोबांची पालखी रथ हा नवीन बनविण्यात आला आहे. त्यासाठी आता राजस्थान मधील सिहोर या गावातून लाकडावर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. लाकडावर कोरीव नक्षीकाम करून हा रथ आता देहूमध्ये दाखल झाला आहे. हा रथ आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरणार आहे. त्यावर केलेलं काम हे सर्वांनाच नक्की मोहीत करेल असं सांगितलं जात आहे. या रथासाठी तब्बल 150 घनफुट लाकडाचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती ही देण्यात आली आहे.
रथासाठी तब्बल 250 किलो चांदीचा वापर होणार आहे. त्यामुळे रथाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. या रथाला ब्रमटीक सागवान जातीचा लाकूड वापरण्यात आलं आहे. दाक्षिणात्य पद्धतीचा कोरीव काम या लाकडावर करण्यात आलं आहे. या रथाला वापरण्यात आलेल्या लाकडाला ऊन वारा पाऊस याचा कोणताही परिणाम होणार नाही. नक्षीकाम करून आलेला हा लाकडी रथ आता देहूच्या मंदिर परिसरात सीसीटीव्हीच्या अंतर्गत आहे. त्यावर चांदी लावण्यात येणार आहे. तर 7 जुलै पर्यंत हे संपूर्ण चांदीचे काम पूर्ण करण्याचा मानस देहू संस्थानचा आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या पालखी सोहळ्याचे कार्यक्रम नियोजन जाहीर झाले आहे. श्री क्षेत्र देहूगाव येथून 7 जुलै रोजी हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी या नियोजनाची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा अधिक मास (धोंड्याचा महिना) असल्यामुळे सोहळा कार्यक्रमाला गतवर्षाच्या तुलनेत 19 दिवसांच्या फरकानंतर प्रारंभ होत आहे. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी संस्थानने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवाय यावर्षा या सोहळ्यात महाराजांच्या पालखीसाठी खास रथ असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world