- ठाण्याचे अजित जोशी आणि पत्नी चित्रा जोशी हे ७३ व्या वर्षी फोटोग्राफीसह वारकरी म्हणून वारीत सहभागी होत आहेत
- चित्रा जोशी रुईया महाविद्यालयातील उपप्राचार्य पदावरून निवृत्त असून दोघांनाही फोटोग्राफीचा छंद आहे
- गेल्या दोन वर्षांपासून हे दाम्पत्य वारीत सहभागी होऊन पालखी आणि वारकरी यांचे फोटो काढून महत्त्वाचे क्षण टिपतात
मयुर बोरसे
प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. छंद जोपासणारे वारकरी ही असतात. मग हाच छंद जोपासत काही वारकरी वारी करतात. त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच असते. विठ्ठल भक्ती सोबत छंद भक्ती ही त्यांची यात होते. असा पद्धतीने छंद जोपासणाऱ्यां पैकी च एक आहेत ठाण्याचे अजित जोशी आणि त्यांची पत्नी चित्रा जोशी. हे दोघे वयाच्या 73 व्या वर्षी वारीकरत आहेत. त्यात ते आपला फोटोग्राफीचा छंद जोपासत आहेत. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले जात होते. त्यांची कहाणी ही भन्नाट आहे. वारी निमित्त या दाम्पत्याने NDTV मराठी सोबत बोलताना आपल्या वारीचा प्रवास उलगडला आहे.
अजित जोशी हे राहणार ठाण्याचे. त्यांचे सध्याचे वय हे 73 वर्षांचे आहे. निवृत्तीचं जिवन ते सध्या जगत आहेत. पण त्यांना लहान पणा पासून एक छंद आहे. तो म्हणजे फोटो ग्राफीचा. त्यांच्या पत्नी चित्रा जोशी. त्याचं ही वय जवळपास तेवढचं. रुईया महाविद्यालयातून त्या उप प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्या आहे. त्याचा ही छंद फोटोग्राफीचा. या दाम्पत्यांना जोडणारा दुवा फोटोग्राफीच ठरली आहे. हे दाम्पत्य गेल्या दोन वर्षापासून वारीत सहभागी होत आहे. ते काही वेळी वारी सोबत चालतात. त्यावेळी ते आकर्षक फोटो ही काढतात.
वारीचा आपला अनुभव या दोघांनी ही एनडीटीव्ही सोबत बोलताना सांगितला आहे. त्यांनी सांगितलं आम्ही दोघे ही ठाण्याहून आलो आहोत. आम्ही गेल्या दोन वर्षापासून काही काळ पालखी सोबत असतो. पण यावर्षा आम्हाला रिंगण पाहायचं होतं. त्याची फोटोग्राफी करायची होती. तो आमच्यासाठी विस्मर्णीय क्षण आहे असं अजित जोशी यांनी सांगितलं. काही खास फोटो त्यामुळे आम्हाला या निमित्ताने मिळाले आहेत. ते आम्ही आमच्या स्मरणात कायम स्वरूपी साठवल्याचं ही त्यांनी सांगितलं.
त्यांची पत्नी चित्र यांनी सांगितलं की या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा उत्साह पाहून आमचा ही उत्साह वाढत आहे. आम्ही वारीचा प्रत्येक क्षण आमच्या कॅमेऱ्यात कैद करत आहोत. एका फोटो बाबत ही त्यांनी सांगितलं. एक 80 वर्षांचे आजोबा तंबोरा घेवून धावत आहे. हा फोट आपल्यासाठी एक प्रेरणाच होता असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. हा फोटो आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. असे असंख्य फोटो आहेत पण हाच आपल्यासाठी खास ठरला आहे. याच वेगाने आम्हाला ही या वारीत पळाण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
अश्वांचा आणि पादुकांचा फोटो अविस्मरणीय आहे असं अजित जोशी यांनी सांगितलं. यावेळी वारीसाठी वारकऱ्यांची केलेली सोय ही खूप छान असल्याचं ते म्हणाले. त्यात आणखी सुधारणा होण्याची गरज ही त्यांनी बोलून दाखवली. वारीमध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला तो कधी ही न विसरणार आहे. त्यातून उत्साह आणि प्रेरणा दोन्ही ही मिळतं असं ही त्यांनी सांगितलं. या वारीत आम्ही वारकरी ही आहोत आणि फोटोग्राफर ही आहोत असं ही त्यांनी सांगितलं. एक एक आनंदाचा क्षण आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे असं ही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world