Nashik Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदु बाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दुसरीकडे अशोक खरात याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियांवर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला असून 74 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरातचे व्हिडिओ व्हायरल कराल तर कारवाई
तुमच्याही मोबाईलमध्ये अशोक खरातचा व्हिडिओ आहे का? अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल करताना १०० वेळा विचार करा. कारण नाशिक पोलिसांनी आता हे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाईस सुरुवात केली आहे. अनेक तरुणांना अशोक खरात प्रकरणातील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे भोवले असून फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या तब्बल 74 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काही लोक एआयचा वापर करुन या प्रकरणात फोटो मॉर्फिंग करत असल्याचेही समोर आले आहे. अशा नेटकऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आगे. या संवेदनशील प्रकरणात आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका असे आवाहनही नाशिक पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, सोशल मिडीयात महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. व्हिडीओज कोण व्हायरल करत आहे ? याचा सायबर पोलिसांकडून शोध सुरू आहे. खरातचेच एकेकाळचे निकटवर्तीय आणि निकटवर्तीयांचे साथीदार व्हिडीओज व्हायरल करत असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादिशेने देखील तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर चर्चा
भोंदू अशोक खरातचे कारनामे गुगलवर सर्वाधिक चर्चेत असून गूगल इंजिनच्या मोस्ट सर्च कॅटेगरीत खरातचे नाव जाऊन पोहोचले आहे. अशोक खरात बाबा, अशोक खरात व्हायरल व्हिडीओज यांसह रूपाली चाकणकरांच्या नावाचे की वर्ड्स सर्वाधिक ट्रेडिंगवर असल्याचं सायबर तज्ञ सांगतायत. अशोक खरात याने कोणत्या राजकीय नेत्यांची आर्थिक फसवणुक केली ? कोणा कोणासोबत त्याचे कसे संबंध, व्यवहार होते ? अत्याचार कोणा सोबत केले ? याची सुद्धा माहिती इंटरनेटवर वेगाने शोधली जाते आहे.
IAS Transferred: राज्यात बदल्यांचा धडाका! 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल