जाहिरात

Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने पीडितांवर अत्याचार कसे केले? पहिल्यांदाच भयंकर तपशील आला समोर

लिंगपिसाट अशोक खरातने पीडितांसोबत केलेलं कृत्य ऐकून कोणच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. 

Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने पीडितांवर अत्याचार कसे केले? पहिल्यांदाच भयंकर तपशील आला समोर

Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने आता अत्यंत भयंकर वळण घेतलं आहे. 67 वर्षांचा अशोक खरात तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचं शोषणच करत नव्हता, तर त्याने 5 जणांचा नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणाचा अंतरिम अहवाल सादर केला. यावेळी लिंगपिसाट अशोक खरातने पीडितांसोबत केलेलं कृत्य ऐकून कोणच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. 

नक्की वाचा - Ashok Kharat Property : अशोक खरातची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चक्रावली; 'खरात फाईल्स'ची भलीमोठी यादी

खरातकडून महिलांसोबत अघोरी कृत्य...

आतापर्यंत पाच पीडितांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसात कथन केला. ही सर्व गुन्हे खरातचे नाशिकच्या ओकस प्रॉपर्टी येथील कॅनडा कॉर्नर येथे झाल्याचं समोर आलं आहे. पहिल्या प्रकरणात आरोपी खरातने एका महिलेला कार्यालयात एकांतात बोलावलं. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडिता गर्भवती असल्याचं कळताच तिचा गर्भपात घडवला. ही बाब कुणाला सांगितली तर तुझं वाईट होईल, मुलांचं वाईट होईल अशी धमकी दिली. 

दुसरं प्रकरण २०२३ नोव्हेंबर ते २०२५ डिसेंबर दरम्यान घडलं असून खरातने एका गर्भवती महिलेचा विनयभंग केला. तो इथवर थांबला नाही त्याने गर्भवती महिलेवर तंत्र-मंत्राची भीती दाखवून बलात्कार केला. यानंतर नकली वाघ आणि साप दाखवून तिला भीती घालण्यात आली. गर्भवती महिलेला लघवी पाजून अघोरी प्रकार केले. याशिवाय त्याने पीडितेकडून मंदिराच्या अकाऊंटवर पैसे घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

तिसरा गुन्हा ७ ऑक्टोबर २०२४ रोजी घडला असून फिर्यादी तिच्या पतीसोबत खरातकडे स्वत:च्या समस्या घेऊन आली होती. खरातने पीडितेच्या पतीला बाहेर बसवलं, महिलेच्य़ा हातावर काळा दगड ठेवला. तिच्या छातीवर-पाठीवर हात फिरवला. हे तू कुणाला सांगितलं तर देवाचा कोप होईल. मी तुला स्पर्श केल्याने तुझं कल्याण झालं आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, असं म्हणत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  

चौथा गुन्हा एप्रिल २०२२-२०२४ दरम्यान घडला. मुलगा व्हावा आणि कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी ही पीडिता खरातकडे गेली होती. त्याच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयात खरातने तांब्याच्या भांड्यात तिला पाणी प्यायला दिलं.  जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. माझ्याशी संबंध ठेवल्याने तू शुद्ध झाली आहेस, कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल अशी धमकी दिली. 

पाचव्या गुन्ह्यात खरातने पीडितेला शंकराचा अवतार असल्याचं सांगितलं. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तू मला नकार दिला तर तुझ्या मुलांचं वाईट होईल. सर्पदंश होऊन मुलांचा मृत्यू होईल, अशी भीती घातली. तिच्या कानात मंत्र उच्चारुन फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com