महायुती-मविआमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या अन् जिंकल्या? कोणाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त?

Assembly Result 2024 : विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्टाचं लक्ष लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. निकालापूर्वीपर्यंत यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे राजकीय तज्ज्ञांनाही निकालाचा अंदाज बांधणं कठीण जात होतं. मात्र निकालानंतर अनेकांना धक्का बसला आहे. अटीतटीची वाटणारी निवडणूक महायुतीने एकहाती काढली. 

नक्की वाचा - ट्रम्पेट चिन्हाने पुन्हा दिला धोका, शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचं विजयाचं गणित फिस्कटलं

कुणी किती जागा लढवल्या आणि कुणाला किती जागा मिळाल्या ?

महायुती - 
भाजपचा 148 जागांपैकी 132 जागांवर विजय 
शिंदे गटाचा 85 जागांपैकी 57 जागांवर विजय 
अजित पवार गटाचा 51 जागांपैकी 41 जागांवर विजय  

(सर्वाधिक स्ट्राइक रेट भाजपचा असून अनुक्रमे 89, 67, 80 टक्के आहे)

महाविकास आघाडी - 
काँग्रेसचा 102 जागांपैकी 16 जागांवर विजय 
ठाकरे गटाचा 96 जागांपैकी 20 जागांवर विजय 
शरद पवार गटाचा 86 जागांपैकी 10 जागांवर विजय

Advertisement

नक्की वाचा - CM पदावरुन राडा ते जागा वाटपाचा घोळ; मविआच्या दारुण पराभवाची 5 मोठी कारणे

कोण होणार मुख्यमंत्री?
विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्टाचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवण्यात यश आलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे. 

Advertisement

कधी होणार शपथविधी?
राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. दरम्यान आज महायुतीचे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. शपथविधीसंदर्भात आज दिल्लीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शपथविधीची वेळ आणि त्यासंदर्भातली घडामोडी आजच ठरण्याची शक्यता आहे.