आज दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यामुळे आता कोणकोणामध्ये लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. दोन आघाड्या आणि सहा पक्ष विधानसभा निवडणुकीत असल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झाली. कित्येकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आणि महायुतीकडून बंडोबांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान आज अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र कित्येक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे.
जाणून घेऊया कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले?
हेमलता पाटील - काँग्रेस, नाशिक मध्य
मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा
विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर
जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड
जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर
अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर
अमित घोडा- भाजप, पालघर
तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व
तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली
सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा
गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली
स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व
नाना काटे- अजित पवार, चिंचवड
बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी
राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी
मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा
सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद
मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद
विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार
मदन भरगड- काँग्रेस, अकोला
प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर
उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी
अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य
सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर
जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला
कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला
जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला
संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ
विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा
किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर
नक्की वाचा - Live Update : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर निवडणूक लढण्यास ठाम
बंडखोरी कायम...
राहुल जगताप - समाजवादी पक्ष, श्रीगोंदा
समीर भुजबळ - अपक्ष, नांदगाव
अंबरिश आत्राम - भाजप, अहेरी
हेमलता पाटील - काँग्रेस, नाशिक मध्य
आबा बागुल - काँग्रेस, पर्वती
हिना गावित - भाजप, नंदुरबार
प्रकाश निकम - शिवसेना शिंदे गट, विक्रमगड