विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) रणशिंग फुंकलं आहे. आज 4 नोव्हेंबरला उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aghadi) अपक्ष अर्ज दाखल केलेल्या नाराज उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतविभागणी टाळायची असेल तर अपक्षांनी अर्ज मागे घेणे आघाडीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजचा दिवस दोन्ही आघाड्यांसाठी महत्त्वाचा आहे. शिवसेनेविरोधात भाजपचे 9 बंडखोर मैदानात असून भाजपविरोधात शिवसेनेच्या 9 बंडखोरांचे अर्ज दाखल केले आहेत. अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाच्या 7 जणांचे उमेदवारी अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे बंडोबांना शांत करणं आघाडीला शक्य होईल का हे आज लक्षात येईल.
Live Update : दिंडोशीमधील ठाकरे गटातील बंडखोरी कायम
दिंडोशीमधील ठाकरे गटातील बंडखोरी कायम
युवा सेना कोर कमिटी सदस्य रुपेश कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता त्यांनी आज अर्ज मागे घेतलेला नाही
दिंडोशी मधून ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे उमेदवार आहेत
महायुतीकडून शिंदे गटाकडून संजय निरुपम, महाविकास आघाडी ठाकरे गट उमेदवार सुनील प्रभू हे उमेदवार आहेत तर मनसेकडून भास्कर परब निवडणुकीच्या रिंगणात आहे.
Live Update : राज ठाकरेंची आज डोंबिवलीत जाहीर सभा..
राज ठाकरेंची आज डोंबिवलीत जाहीर सभा..
Live Update : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवार मधुरीमा राजेंची माघार
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवार मधुरीमा राजेंची माघार
Live Update : नवी मुंबईतील महायुतीत दोन्ही मतदारसंघात बंडखोरी कायम
नवी मुंबईतील महायुतीत दोन्ही मतदारसंघात बंडखोरी कायम
शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख
विजय चौगुले यांची बंडखोरी कायम तर बेलापुर विधानसभेत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याकडून अपक्ष अर्ज कायम..
ऐरोली विधानसभेत
भाजपा उमेदवार गणेश नाईक यांच्या समोर बंडखोरी करीत विचय चौगुले यांनी अपक्ष अर्ज मागे घेण्यास नकार
विजय चौगुले यांच्या बंडखोरीमुळे भाजपा उमेदवार गणेश नाईक यांना फटका बसण्याची शक्यता
बेलापुर विधानसभेत भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांना विजय नाहटा यांच्या बंडखोरीमुळे फटका बसण्याची शक्यता.
Live Update : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांची माघार
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी अखेर आज आपला उमेदवारी अर्ज माघार घेत महायुतीचा एकनिष्ठ ने प्रचार करणार असल्याचं म्हटलंय, वरिष्ठाच्या आदेशाने मी माघार घेत असल्याचे यावेळी प्रदीप कंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Live Update : रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीनंतर भास्कर दानवे यांचा उमेदवारी अर्ज मागे..
रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थी नंतर भास्कर दानवे यांचा उमेदवारी अर्ज मागे..
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी आज पक्षाच्या मनधरणीनंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघात आता खोतकर विरुद्ध गोरंट्याल अशी सरळ लढत बघायला मिळणार आहे. भास्कर दानवे यांनी जालना विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र ही जागा शिंदे गटाच्या वाटेला गेल्याने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे हे नाराज झाले होते. त्यांनी पक्षा विरुद्ध बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने भास्कर दानवे यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला
Live Update : अर्ज मागे घेण्याची वेळ संपली
विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची वेळ संपली
Live Update : अंधेरीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला
अंधेरीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला
Live Update : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर निवडणूक लढण्यास ठाम
सदा सरवणकर कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र यावेळी राज ठाकरेंनी भेट नाकारली. त्यानंतर सदा सरवणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक लढण्यास ठाम असल्याचं ते यावेळी म्हणाले.
अपक्ष उमेदवारीचा दावा केलेल्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार देवराव होळी यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला
अपक्ष उमेदवारीचा दावा केलेल्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार देवराव होळी यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला
माजी खासदार सदाशिव लोखंडे व त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी घेतली अपक्ष उमेदवारी मागे
श्रीरामपुर मतदारसंघात महायुतीतील बंड शमविण्यात यश, माजी खासदार सदाशिव लोखंडे व त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी घेतली अपक्ष उमेदवारी मागे.
विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छुकांना पक्षाकडुन उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपुर मतदारसंघातुन शिंदेच्या शिवसेनेकडुन इच्छुक असलेल्या माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत यांना उमेदवारी न देता माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज असलेल्या लोखंडे पिता-पुत्रांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अखेर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोखंडे यांच्याशी चर्चा करत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत लोखंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. पक्षांना उमेदवारी न दिल्याची खंत आहे.
Live Update : पुण्यातही महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं, पर्वती मतदारसंघातून आबा बागुल लढण्यावर ठाम
पुण्यातही महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
पर्वती मतदारसंघातून आबा बागुल लढण्यावर ठाम
महाविकास आघाडीच पुण्यातील शिष्ट मंडळ आबा बागुल यांच्या भेटीला
आबा बागुल यांची समजूत काढण्यात मात्र यश नाहीच
आबा बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम
Live Update : जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार
जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे
अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
जयदत्त क्षीरसागर आता कुणाला पाठींबा देतात याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते.
दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आहे.
Live Update : विधानसभेतून कोण घेणार माघार?
Live Update : बोईसर मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार जगदीश धोडींचं बंड क्षमलं
जगदीश धोडी यांचा उमेदवारी अर्ज मागे
निवडणुकीच्या रिंगणातून जगदीश धोडी यांची माघार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बोलून धोडी यांची काढली समजूत
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून निवडणुकीच्या रिंगणातून माघार
जगदीश धोडी यांचे स्पष्टीकरण
जगदीश जोडी यांनी अर्ज मागे घेतल्याने अधिकृत उमेदवार विलास तरे यांना मोठा दिलासा
Live Update : अमरावतीच्या अचलपूरमधील भाजपची बंडखोरी क्षमवण्यात पक्षश्रेष्ठींना यश...
अमरावतीच्या अचलपूरमधील भाजपची बंडखोरी क्षमवण्यात पक्षश्रेष्ठींना यश...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनिल बोंडे यांच्या मध्यस्थीने बंडखोरांच्या तलवारी म्यान...
माजी सभापती अक्षरा लहाने व नंदू वासनकरांनी उमेदवारी घेतली मागे..
लहाने आणि वासनकर यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार प्रवीण तायडेविरुद्ध थोपटले होते दंड..
Live Update : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार
Live Update : सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक असताना, सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सदा सर्वांकर त्यांचा अंतिम निर्णय घेणार आहे
शिराळा विधानसभा मतदार संघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडीक यांची माघार
शिराळा विधानसभा मतदार संघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडीक यांची माघार आणि भाजपचे अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ यासाठी जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला प्रवीण दरेकर याची उपस्थिती..
Live Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली, निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले. रश्मी शुक्लांनंतर सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Acting on the complaints from INC and other parties, Election Commission of India orders transfer of Rashmi Shukla, DGP Maharashtra with immediate effect with directions to Chief Secretary to hand over her charge to the next senior most IPS officer in the cadre. The Chief… pic.twitter.com/DqocropZo0
— ANI (@ANI) November 4, 2024
कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेस बंडखोर उमेदवार मुख्तार शेख यांची बंडखोरी शमवण्यात काँग्रेस पक्षाला यश
पुणे - कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेस बंडखोर उमेदवार मुख्तार शेख यांची बंडखोरी शमवण्यात काँग्रेस पक्षाला यश
उमेदवारी माघारी घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांना मुख्तार शेखयांचा पाठिंबा
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
Live Update : कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, अर्ज मागे घेण्याबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, अर्ज मागे घेण्याबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
Live Update : सदा सरवणकर यांची पत्रकार परिषद...
सदा सरवणकर यांची पत्रकार परिषद...
Live Update : गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांचा कुलगुरूपदाचा राजीनामा
गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांचा अखेर राजीनामा
अजित रानडे यांचा कुलगुरू पदाचा राजीनामा
वैयक्तिक कारणामुळे अजित रानडे यांनी दिला राजीनामा
अजित रानडे यांचा संस्थेला राजीनामा लिहीत तत्काळ पद सोडण्याचा निर्णय
गेल्या अनेक दिवसापासून संस्थेत गैरव्यवहार केल्याचा अजित रानडे यांच्यावर आरोप करत चौकशी समितीकडून ठेवण्यात आला होता ठपका
मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार देणार नाही!
मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार देणार नाही!\
Live Update : तीन दिवसात शेकडो युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश
तीन दिवसात शेकडो युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षम नेतृत्व आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तीन दिवसात 500 पेक्षा अधिक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात काँग्रेस आणि इतर पक्षातील युवक आणि काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वांचं भगवा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात युवकांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानं आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीत त्यांना याचा फायदा होईल.
Live Update : नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे आज राज्यात अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक मतदारसंघामध्ये तगड्या उमेदवारासमोर डमी उमेदवार उभे आहेत. डमी उमेदवार उभे करण्यामागे आर्थिक व्यवहार झाल्याचेही आरोप एकमेकांवर करण्यात आले आहेत. कोण कोण डमी उमेदवार माघार घेणार ? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Live Update : घाटगें पाठोपाठ मुश्रीफानी घेतली जरांगे पाटलांची भेट
घाटगें पाठोपाठ मुश्रीफांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
कागल मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवारांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवारी हसन मुश्रीफ यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची पाटील यांच्याशी कोणती चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क बांधले जातायत. मराठा नेते असल्यामुळे कागल मधील मराठा मतदारांबाबत चर्चा झाली असावी अशा चर्चा देखील सोशल मीडियावर आहेत.
Live Update : येत्या 6 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा
महाविकास आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईत येत्या 6 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे. महाविकास आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेत महाविकास आघाडीच्या 5 गॅरेंटी जाहीर केल्या जाणार आहेत. या सभेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद होणार आहे
Live Update : काँग्रेसमधील बंडखोरांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार
काँग्रेसमधील बंडखोरांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार
काल दिल्लीत प्रभारी रमेश चेन्नीथला आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवणी करण्यात आली आहे. मात्र काही उमेदवारांनी बंड कायम ठेवत उमेदवारी अर्ज मागे न घेण्याच्या निर्णय घेतला आहे. कोपरी पाचपाखाडीमधून माजी नगरसेवक मनोज शिंदे तर अंधेरी पश्चिममधून माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी अजूनही उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे