राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे ही जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फेकबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास तपास केल्या जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर ज्याचे हे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे. लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी आहे.
(नक्की वाचा- Baba Siddique बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? प्रत्येकाला मिळणार होते...)
Akola News
दरम्यान अकोला पोलिसांनी देखील लोणकर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अकोला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र शुभम लोणकर याच्या घराल कुलूप लावलेलं दिसून आलं.
(नक्की वाचा- एक भंगार विक्रेता, दुसरा 10 वर्ष घरी गेला नाही; बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी कोण?)
शुभम लोणकरच्या घरी कोणीही नसल्याच पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गावात नाही. तो पुण्यात असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त केली होती. शुबू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या जवळचा असल्याचं म्हटलं जात आहे.