शुभम बायस्कार, प्रतिनिधी
प्रहारचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेच्या नियमावर बोट ठेवतं अमरावतीच्या विभागीय निबंधकांनी (सहकारी संस्था) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक तथा अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवले आहे. राजकारणासह सहकार क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या या निर्णयाविरुद्ध कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर गुरुवारी १९ जून रोजी सुनावणी होतं आहे. त्यामुळे कडूच्या जिल्हा बँकेतील सत्तेसह राजकीय वाटचालीवर या निर्णयाने बराच परिणाम होणार आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बच्चू कडूंचे अचलपूर मतदार संघातील परंपरागत विरोधक बबलू देशमुख यांच्या गटाचं वर्चस्व राहील आहे. मात्र तिकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि इकडे काहीच दिवसांनी बच्चू कडूंनी जिल्हा बँकेतील काँग्रेसच्या सत्तेला सुरंग लावला. कडुनी विरोधी गटातील संचालकांना फोडत जिल्हा बँकेतील सत्ता मिळवत स्वतःकडे अध्यक्ष पद घेतले. तेव्हापासूनच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुरघोड्या पाहायला मिळत आहेत. बच्चू कडूना बँकेत अडचणीत आणण्याचे आटोकाट प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. त्यातच बच्चू कडूचे एक जुने प्रकरण विरोधकांच्या हाती लागले.
बच्चू कडू यांनी नाशिक येथे 2017 मध्ये आंदोलन केले होते. याच प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्यांना 8 मार्च 2023 रोजी नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. हे प्रकरण तिथे सध्या न्यायप्रविष्ठ असतानाच जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह विरोधी गटातील संचालकांनी याप्रकरणी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्याचे कलम 73- कअ (1) चार व नऊ व बँकेची मंजूर उपविधी क्रमांक 8 मधील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती किंवा व्यवस्थापकीय सदस्य याला एक वर्षाचे फौजदारी कारवाईची शिक्षा सुनावली गेली असेल तर बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही. अथवा निवडणुकीसाठी पात्र ठरणार नाही याच प्रकरणी अमरावतीचे विभागीय सहनिबंधक चैतन्य नासरे यांनी बच्चू कडून बँकेच्या संचालक आणि अध्यक्ष पदावरून अपात्र केले आहे.
नक्की वाचा - Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप
13 मे 2025 रोजी नासरेंनी हा देश जाहीर केला. बच्चू कडूंनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 8 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन पुढे सहा दिवस म्हणजे 14 जून पर्यंत चाललं. तोपर्यंत विभागीय सहनिबंधकांनी बच्चू कडूना जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदावरून अपात्र केल्याचा आदेशच बाहेर आला नाही. मात्र प्रत्यक्षात बच्चू कडूवरील कारवाईचा आदेश हा त्यांच्या आंदोलनाच्या एक महिना पूर्वीचा असल्याची नोंद आहे. नासरेंनी दिलेल्या आदेशाला बच्चू कडूनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे बच्चू कडूचे अध्यक्षपद कायम राहते की त्यांना पदावरून दूर व्हावे लागते याकडे सहकारासह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.