शुभम बायस्कार, अमरावती:
bachhu kadu everest base camp trek: जगातील सर्वोच्च पर्वत शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करणे हे जिकिरीचे काम. एव्हरेस्ट सर करण्याची अनेक गिर्यारोहकांची इच्छा असते. हे शिखर सर करण्यास गिर्यारोहकांना तब्बल दीड ते दोन महिने लागतात. त्याशिवाय बदलते हवामान, शारीरिक थकवा यांसह विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. अशातच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी ८ दिवसांत ५३६४ मीटरची ऐतिहासिक मजल मारत ही मोहिम फत्ते केली आहे.
Akola News: अकोला मनपामध्ये मित्रपक्षांतच 'ठिणगी'! स्थायी समिती बैठकीत भाजप-शिवसेना आमनेसामने
बच्चू कडूंची मोहिम फक्ते
अमरावतीचे माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलक बाण्याप्रमाणेच गिर्यारोहणातही एक वेगळा ठसा उमटवला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या ५३६४ मीटर (१७,५९४ फूट) उंचीवरील बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक कडू यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, कोणतीही 'व्हीआयपी' सुविधा न घेता, एका सामान्य गिर्यारोहकाप्रमाणे त्यांनी हे आव्हान पेलले.
हा प्रवास अत्यंत खडतर होता. उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात आणि ऑक्सिजनची पातळी केवळ ४५ टक्क्यांवर असतानाही बच्चू कडू यांनी माघार घेतली नाही. 'द अल्पायनिस्ट' संस्थेच्या माध्यमातून आणि भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. एकूण १४ जणांच्या चमूने दररोज सरासरी १२ ते १४ किलोमीटर पायपीट केली, तर शेवटच्या दिवशी तब्बल १७ किलोमीटरचा टप्पा पार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर, कडू यांनी ही मोहीम भारतीय संविधान आणि भगवद्गीतेला समर्पित केली. नेपाळमधील ट्रेकिंग संस्कृती पाहून प्रभावित झालेल्या कडू यांनी महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या जागतिक दर्जाच्या ट्रेकिंग सुविधा विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Indian Railway : 'या' ट्रेनचा AC कोच म्हणजे 'चालता फिरता बार'; डिमान्डनुसार मिळायची दारू