ओंकार कुलकर्णी, धाराशिव
AJit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेकदा मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी जाहीर वक्तव्ये केली आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्रिपद त्यांच्या वाट्याला आलेलं नाही. त्यांच्या सासरवाडीच्या मंडळींची देखील हीच इच्छा असल्याचं दिसून आलं आहे.
अजित पवारांचे सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. अजित पवारांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. धाराशिवकरांचे जावई प्रेम की नव्या बदलाची नांदी? अशा आशयाचे ही बॅनर्स आहेत.
Ajit Pawar
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच दुसरीकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. धाराशिव शहरात ऐन वर्दळीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. 22 जुलै रोजी अजित पवारांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्ताने हे बॅनर आहेत.