जाहिरात

Beed Crime: बीडमध्ये संस्थाचालकाची गुंडगिरी! शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ; पतीला मारहाण

धुणी-भांडी, फरशी पुसणे आणि शेतातील खुरपणीचे काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या कामास नकार दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून वेतन रोखल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Beed Crime: बीडमध्ये संस्थाचालकाची गुंडगिरी! शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ;  पतीला मारहाण

आकाश सावंत, बीड:

Beed News:  बीडमध्ये एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची गुंडगिरी समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत, पतीला शासकीय कार्यालयातच मारहाण केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून त्यात अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी देताना दिसत आहे.

महिला कर्मचाऱ्याला घरातील धुनी भांडी व झाडूपोछा तसेच शेतातील खुरपणीचे व कापूस वेचणीचे काम करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेतातील आणि घरचे काम न केल्याने सहा महिन्यापासून वेतन रोखण्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP Crisis: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांना न सांगताच तटकरे, प्रफुल पटेलांची... पडद्यामागे काय घडतंय?

बीडमध्ये संस्थाचालकाची गुंडगिरी

बीड जिल्ह्यातील अंतरवन पिंपरी तांडा येथील आश्रमशाळेतील स्वयंपाकी सुरेखा चव्हाण यांनी संस्थाचालक दिनेश लाला पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेच्या कामासोबतच घरी धुणी-भांडी, फरशी पुसणे आणि शेतातील खुरपणीचे काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या कामास नकार दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून वेतन रोखल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, तक्रार करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात गेलेल्या सुरेखा चव्हाण यांच्या पती सतीश राठोड यांना संस्थाचालकाने अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात संस्थाचालकाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Ajit Pawar Jayanti: अजित पवारांच्या लोकसेवेचा गौरव! दादांची जयंती अधिकृतपणे होणार साजरी, सरकारचा मोठा निर्णय

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com