NCP Crisis News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला आहे. पक्षामध्ये दोन गट पडले असून सुनेत्रा पवार, पार्थ पवार विरुद्ध प्रफुल पटेल, सुनील तटकरे असा संघर्ष सुरु असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान देण्यात आलं होते. अशातच आता सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून तटकरे- पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.
तटकरे- पटेलांची वर्षावर खलबंत, पक्षाला माहिती नाही..
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र याबाबत पक्ष नेतृत्वाला कोणतीही माहिती नसल्याची बाब पुढे आली आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीबाबत सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांना माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे पक्षातील अंदर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत पक्षाच्या कोअर बैठकीत चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीत बदलाचे वारे..
दुसरीकडे, राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्ष यांसह महत्वाचे संघटनात बदल होण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवार यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते पुढील काळात प्रदेश संघटनात बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची शक्यता असून या जागी अन्य नेत्यांची वर्णी लावावी काय़ याचा विचार पक्ष वरिष्ट नेते करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांसह काहींची चर्चत आहेत तर वैषाली नागवडे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढली, पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठा घटला, पाहा आकडेवारी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world