आकाश सावंत, बीड:
Beed News: देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अवघा देश तिरंगी रंगात रंगला असून देशभक्तीचा अलोट संगम पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरु असतानाच बीडमधून एक वेगळ्याच आंदोलनाची बातमी समोर आली आहे. बायको नांदत नसल्याने एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयावर चढत आत्मदहनाचा इशारा दिला.
Republic Day LIVE: CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत, DCM शिंदेंच्या हस्ते ठाण्यात ध्वजवंदन
पत्नी नांदेना, तरुणाने सुरु केले आंदोलन..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संसार म्हटलं की पती-पत्नीमध्ये वाद हे आलेच. अनेकदा तुम्ही पतीकडून पत्नीला मारहाण करत घराबाहेर काढल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. मात्र बीडमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. पत्नी नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार सुरळीत करावा, या अनोख्या मागणीसाठी आंदोलन केले. धक्कादायक म्हणजे याआधीही या तरुणाने तब्बल 5 वेळा आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
पोलिसांची डोकेदुखी वाढवली
आता पुन्हा सहाव्यांदा हा तरुण बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर चढून आत्महत्याचा इशारा दिला आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे.. याच निमित्ताने या तरुणाने पुन्हा एकदा एक अनोख आंदोलन सुरू केले. सहाव्यांदा आंदोलन सुरू असल्याने पोलिसांच्या ही डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे. नितीन उबाळे असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान इमारतीवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Ganesh Naik: '...तर यांचा नामोनिशान संपवून टाकू', गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
दुसरीकडे, बुलढाण्यातील एका तरुणाच्या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे. बुलढाण्याच्या मांडवा तालुक्यात वैभव करे या युवकाने 300 फूट टॉवरवर चढूनग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मांडवा तालुक्यातील मेहकर येथे हा प्रकार घडला. तरुणाच्या आंदोलनाने प्रशासनाची एकच प्रारंभ उडाली. आपल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या याकरता त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात आहे. प्रशासन त्याला समजूत घालण्याचा प्रयत्न असल्याचं समजते व आपलं म्हणणं टावरच्या खाली येऊन सांगण्याची विनंती करीत आहे.