जाहिरात
33 minutes ago

Indian Republic Day LIVE:  भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी अवघा देश तिरंगी रंगात न्हावून निघाला आहे. आज देशभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना दिसणार आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन होणार आहे. 

महाराष्ट्रामध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सकाळी  ९.१५ वाजता प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन संपन्न होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहणार आहेत.

Republic Day LIVE Updates:प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना धक्काबुक्की

जालन्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये माध्यम प्रतिनिधीना आणि पत्रकारांना धक्काबुक्की.

पालकमंत्री पंकजा मुंडेच्या कार्यक्रमांमध्ये पोलिसांची पत्रकारांना धक्काबुकी.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरू असताना पोलिसांनी केली पत्रकाराने धक्काबुक्की.

प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम शूट करत असताना पोलिसांनी केली माध्यम प्रतिनिधींना धक्काबुकी.

पोलिसांच्या मुजोर भूमिकेचा पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधीनी केला निषेध व्यक्त

Republic Day LIVE Updates: शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते अमरावतीत ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर,  पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान दादा भुसे यांनी परेड निरीक्षण केले. जिल्ह्यासह राज्यातील शासकीय योजनांची प्रगती सरकारची कामगिरी यावर त्यांनी प्रकाश टाकला.

Republic Day LIVE Updates: CM फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे संपन्न होत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन करण्यात आले. 


Republic Day LIVE Updates: पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे पोलिस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन..

Nashik Republic Day LIVE Update: नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर मंत्री गिरीश महाजन करणार शासकीय ध्वजवंदन

- नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर थोड्याच वेळात मंत्री गिरीश महाजन करणार शासकीय ध्वजवंदन

- नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री अद्यापही निश्चित नसतांना पुन्हा गिरीश महाजन यांना देण्यात आला मान

- नाशिकमध्ये ध्वजवंदन कोण करणार याबाबत होता संभ्रम

- नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिंदे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा आहे दावा 

- नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांचा वरचष्मा

Republic Day LIVE Updates: ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन

भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिवस निमित्ताने ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाणार 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात झेंडावंदवासाठी उपस्थित 

ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती..

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजप आ. संजय केळकर माजी आ.रविंद्र फाटक यांची उपस्थिती..

शासकीय ध्वजारोहण, दरम्यान पोलिस करणार पथसंचलन 

शासकीय कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन केला जाणार सत्कार....

Republic Day LIVE Updates: पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे यकचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

कोल्हापुरचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात आला आहे. पोलीस दलात त्यांनी एकूण ३५ वर्ष सेवा बजावली. कोल्हापूर जिल्हयातील पोलीस ठाणे, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. सध्या ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कार्यालयामध्ये वाचक शाखेत कार्यरत आहेत. 

त्यांनी आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असुन बास्केटबॉल, हॉकी, ॲथलेटिक्स स्पर्धेत गोल्ड आणि सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावत एकुण १७५ बक्षीसे मिळविलेली आहेत. आज त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आलेले आहे.

Republic Day LIVE Updates: "प्रजासत्ताक दिन लोकशाहीचे प्रतिक" PM मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेला हा राष्ट्रीय सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ होवो.

प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वातंत्र्याचे, संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हा सण आपल्याला राष्ट्र उभारणीच्या संकल्पाने एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

Republic Day LIVE Updates: विठ्ठल मंदिरात दोन टन फुलांपासून तिरंगी रंगाची सजावट

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दोन टन फुलांपासून तिरंगी रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिरात तिरंगी रंगाचे झेंडेही लावण्यात आले आहेत. तर विठ्ठल आणि रुक्मिणी माते तिरंगी रंगाचा शेला परिधान करण्यात आलाय. त्यामुळे एरवी भक्तिमय वातावरणात असणारे पंढरपूर आज देशभक्तीत रममाण झाले आहे.

Republic Day LIVE Updates: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तिरंगी रंगाची खास झलक

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तिरंगी रंग्याची आकर्षक रोषणाई:

Republic Day LIVE Updates: मुंबई विमानतळावर आकर्षक रोषणाई

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ तिरंगी रंगात रंगले: 

Republic Day LIVE Updates: 77 वा प्रजासत्ताक दिन! अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रोषणाईने उजळले

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे. या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची मुख्य इमारत अतिशय आकर्षक आणि देखण्या विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण प्रशासकीय परिसर झळाळून निघाला असून, ही रोषणाई अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.तिरंगी रंगाची उधळण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर करण्यात आलेल्या रोषणाईमध्ये प्रामुख्याने केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तिरंगी छटांचा वापर करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात लखलखणारे हे तीन रंग पाहून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिकच प्रबळ होत आहे. इमारतीच्या दर्शनी भागावर करण्यात आलेल्या या प्रकाशयोजनेमुळे परिसराला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली आहे.

Republic Day LIVE Updates: भाजप प्रदेश कार्यालयात होणार ध्वजवंदन

भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.30 वाजता 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन आणि भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन  होणार असून यावेळी भाजपचे मुंबईतील नेतेही उपस्थित राहतील.

Republic Day LIVE Updates: शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजावंदन

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सकाळी  ९.१५ वाजता प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन संपन्न होईल

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com