OBC Reservation Issue : ओबीसी समाजाचा आरक्षण गेलं म्हणत लातूर जिल्ह्यातल्या रेणापुर येथे एकाने आत्महत्या केल्याची घटना ताजीच असताना आता बीडच्या नाथापूर गावात एका व्यक्तीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. मुलगी पोलीस भरतीसाठी सराव करते आता मुलीचं काय होईल याच भीतीपोटी नैराश्यातून गोरख नारायण देवडकर या व्यक्तीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. ओबीसी आरक्षण बचावासाठी दुसरी आत्महत्या झाल्यानंतर बीडमध्ये आता खळबळ उडाली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी पित्याने मुलीसोबत संवाद साधत खंत व्यक्त केली. तुझ्या भविष्याचं आता तूच बघ असं म्हणत मध्यरात्रीच्या सुमारास बापाने गळफास घेतला. आत्महत्या नंतर देवडकर कुटुंब अस्वस्थ झाला आहे. माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने जीवन संपवलं तसं कुणाच्याही वडिलांनी जीवन संपवू नये असं भावनिक आवाहन आत्महत्या केलेल्या पित्याच्या लेकीने केला आहे. दरम्यान आत्महत्येची घटना समजतात ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी रुग्णालयात धाव घेतली. सरकारने आता जागं झालं पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे एवढेच नाही तर रेनापुर असेल, आता बीड या दोन्हीही कुटुंबाचं पुनर्वसन सरकारने करावं अशी मागणी सानप यांनी केली आहे.
नक्की वाचा - Chagan Bhujbal : 'GR मागे घ्या अन्यथा अराजकता माजेल'; मराठा आरक्षणावरून भुजबळांचा आपल्याच सरकारला इशारा
11 सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील 35 वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली आहे. भरत कराड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. यामुळे पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कराड यांनी यापूर्वीही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.