वाल्मीक कराडकडून खंडणी वसूली केल्याने शिवराज बांगर ही व्यक्ती चर्चेत आली आहे. पण वाल्मीक कराडकडून शिवराज बांगरेने चक्क 15 लाखाची खंडणी वसूल केली ही गोष्ट अनेकांना पचणी पडत नाही. "असं काही होऊ शकतं यावर विश्वास बसत नाही", असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट केलं आहे. शिवराज बांगरला राजकीय स्पर्धेतून अडकवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कालपासून मीडियामध्ये वाल्मीक कराड याच्याकडून 15 लाख रुपये खंडणी घेतल्याच्या बातम्या सुरु आहेत. तो हाच शिवराज बांगर आहे. हा ऊसतोड कामगरांच्या हक्कासाठी लढतोय, भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगरांचा मेळावा घेतोय. वंजारी समाजातील हा पोरगा पुढे जड जाणार, वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करतोय, म्हणुन त्याला आणि याच्या कुटुंबाला धंनजय मुंडे आणि वाल्मीक कराडने गेली 5 वर्षे प्रचंड छळलंय"
"त्याचे वयोवृद्ध आई-वडील, पत्नी यांच्यावर आनेक खोटे गुन्हे दाखल केलेत. त्यापैकी हा खंडणीचा 1 गुन्हा आहे. असे शेकडो वंजारी समाजातील तरुण यांनी कायद्याचा दुरुपयोग करून संपवलेत. यांच्यावर वेळ आली की समाजाचे पांघरून घ्यायचे आणि वेळ निघून गेली की, समाजातील तरूणांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचे हे यांचे समाज प्रेम. अशा समाजातील उद्ध्वस्त लोकांची यादी खूप मोठी आहे", असंही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
काय आहे प्रकरण?
वाल्मीक कराडकडून शिवराज बांगरने चक्क 15 लाखाची खंडणी वसूल केल्याची तक्रार 3 जानेवारी 2024 रोजी दाखल करण्यात आली आहे. वाल्मीक कराडला शिवराज बांगर ही व्यक्ती वारंवार धमक्या देत होती असं तक्रारीत म्हटलं आहे. बांगर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. बांगर वारंवार वाल्मीक कराडला फोन आणि वॉट्सअपकॉल करून त्रास देत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. मला 15 लाख द्या नाही तर मी तुला ठार मारेन. गाडी अंगावर घालेन अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या असंही या तक्रारीत आहे.
शिवराज बांगर धमक्यांनंतर परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात आला होता. त्याने आपल्याला वाल्मीक कराडने पाठवले असल्याचे सांगितले. शिवाय आपल्याला 15 लाख द्यायला सांगितले आहे असंही त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या गणेश उगले याला सांगितले. उगले हा कार्यालयात टायपिंगचे काम करतो. त्यानंतर उगले याने वाल्मीकला फोन केला. बांगर 15 लाख मागत असल्याचं सांगितलं. त्यावर तो आपल्याला धमकी देत आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल. त्यामुळे त्याला 15 लाख दे असं वाल्मीकने सांगितलं. त्यानुसार उगेल यांनी कार्यालयाच्या लॉकरमध्ये असलेले 15 रुपये शिवराज बांगर याला दिले. मात्र काही दिवसानंतर परत त्याने वाल्मीकला धमकी दिली. त्यावेळी वाल्मीक कराडने पोलिसात तक्रार दाखल केली.