स्वानंद पाटील, बीड
काका विरुद्ध पुतण्या संघर्ष राज्याला नवीन नाही. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये या विधानसभेला काका विरुद्ध दोन्ही पुतणे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याआधी जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप क्षीरसागर असा सामना 2019 मध्ये सामना पाहायला मिळाला होता. आता दुसरा पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर देखील काका जयदत्त क्षीरसागरांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या विधानसभा निवडणुकीला तीन क्षीरसागर पहिल्यांदाच एकमेकांविरोधात असल्याचं पाहायला मिळतंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
किती काका आणि किती पुतणे निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, हे अंकगणित नसून केमिस्ट्री असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं. तसेच त्यांनी नाव न घेता आपल्या पुतण्यांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल चढवला आहे. कोण कोण येत आहेत हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्यांविरोधात दंड थोपटले आहेत.
एका पक्षाचे दोन पक्ष झाल्याने पक्ष वाढल्यामुळे सर्वांनाच उमेदवारांची गरज आहे. त्यांनाही संधी मिळाली असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे, असे योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर संदीप क्षीरसागर म्हटलं. सगळ्या पक्षाच्या दारात जाऊन बसले, मात्र त्यांना एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यांची विश्वासार्हता संपली आहे, असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला.
ट्रेंडिंग बातमी - माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद
आम्ही नेहमी विकासाचे राजकारण केले आहे. क्षीरसागर कुटुंबातील तिहेरी लढाईवर बोलताना, त्यांचे विचार वेगळे आहेत त्यांचे पक्ष आणि आमचे पक्ष वेगळे आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. त्यांनी कितपत काम केले त्याचा आढावा गेल्या पाच वर्षात जनतेनी घेतला आहे. आता या वेळेस आम्हाला जनता नक्कीच संधी देईल, असं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं.
गेल्या काही दिवसात अनेकांनी संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात पवारांकडे सूर आळवल्याचे समजते आहे. मात्र तरीही संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभेची उमेदवारी मिळवली. त्यातच योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी खेचून आणली. तर जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष उभे राहिले आहेत. एकंदरीतच राज्यातील राजकारणामुळे नात्यातील दुरावा वाढताना दिसत आहे.
मुंडे भाऊ-बहीणीनी खेचून आणली जागा
महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची बीडच्या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच होती. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी अजित पवार यांनी ताकद लावली होती. तर अनिल जगताप यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर लावला होता. बीडची जागा जवळपास शिवसेनेच्या वाट्याला गेली होती, अशा परिस्थितीत योगेश क्षीरसागर यांनी घड्याळाचे काटे फिरवले मुंडे बहीण-भाऊ यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सहकार्याने सेनेच्या वाटेला गेलेली जागा राष्ट्रवादीने खेचून आणली.