प्रविण मुधोळकर, नागपूर
Bhandara Accident : बोलेरो पिक अप आणि बाईक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील पाथरी येथे ही घटना घडली आहे. मृतांमध्ये पाच वर्षीय मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ एकाच दुचाकीने चार जण रात्री 11 वाजेच्या सुमारास जात होते. त्यावेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिक अप गाडीने बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
एक महिला या अपघातात गंभीर जखमी होती, तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये कैलाश मरकाम, पारबता मरकाम, यामिनी कंगाली 5 (वर्ष) आणि दुर्गा कंगाली यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.