अभय भुते, भंडारा:
Bhandara BJP Vs Shivsena Dispute: भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमधील वाद उफाळून आला आहे. भंडाऱ्यातील भिलेवाडा शिवसेना शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
भाजप- शिवसेना शिंदे गट भिडले!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भंडारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. भंडारा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.. भाजपा व शिवसेना शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली आहे. माजी तालुकाध्यक्ष व जिल्हापरिषद विरोधी पक्ष गटनेता विनोद बांते व शिवसेना पदाधिकारी राकेश बांते यांच्या दोन्ही गटात हाणामारी झाली आहे.
रिकाम्या फ्लॉटवर साहित्य ठेवण्यावरुन हा सर्व राडा झाला. यावेळी तलवारीने एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात राकेश बांते याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला तीन टाके लागले आहेत. ह्या हाणामारीमुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. आता दोन्ही पक्षाचे पदाधिकारी तक्रार देण्यासाठी कारधा पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले होते दाखल करण्यात येत आले आहे. तर भाजपा जिल्हा अध्यक्ष सह अनेक पदाधिकारी पोलिस स्टेशनला पोहचले होते.
Pune News : पुण्यात मुख्य जलवाहिनी फुटली, रस्ते झाले जलमय, 'या' ठिकाणी पाणी पुरवठा होणार खंडित?