जाहिरात

Pune News : पुण्यात मुख्य जलवाहिनी फुटली, रस्ते झाले जलमय, 'या' ठिकाणी पाणी पुरवठा होणार खंडित?

पुण्यात अचानक मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाण्याचा फवारा उडाला आणि रस्ते जलमय झाले.

Pune News : पुण्यात मुख्य जलवाहिनी फुटली, रस्ते झाले जलमय, 'या' ठिकाणी पाणी पुरवठा होणार खंडित?
Pune Water pipeline Leakage News Today
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Water Supply News Today :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आनंद ऋषी महाराज चौकात पुणे महानगरपालिकेकडून जलवाहिनीचे काम केले जात होते. अचानक मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाण्याचा फवारा उडाला आणि रस्ते जलमय झाले. दरम्यान, पुणे महापालिकेकडून जल पुरवठा बंद करण्यात आला नाही. यामुळे औंध बाणेर पाषाण बालेवाडी परिसरात पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. सायंकाळी 7 वाजल्यापासून पाइपलाइन फुठली आहे. स्थानिक नागरिकांनी दुकानधारकांनी होणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात तसेच नियंत्रण कक्षाला वारंवार फोन करून सदर पाईपलाईन फुटल्याची माहिती दिली आहे. लाखो लिटर पाणी वाहून रस्त्यावर वाहत आहे. 

नक्की वाचा >> छत्रपती संभाजीनगरात 'या' पदवी परीक्षेचा पेपर फुटला, 140 रुपयात WhatsApp वर पेपर विकले, कसा झाला पर्दाफाश?

नागरिकांना पाणीटंचाईला सामोर जावं लागणार?

या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या औंध बाणेर पाषाण बालेवाडी महाळुंगे या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना पाणीटंचाईला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे याच मार्गावर पूर्वीचे राजभवन आणि सरकारी अधिकाऱ्यांचे निवासस्थान आहेत. 

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' कॉलेजमध्ये मधमाशांचे पोळे अन् बरंच काही..विद्यार्थ्यींनी केलं बोंब ठोक आंदोलन

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या मार्गांवर राहत असल्यामुळे पुणे महानगरपालिका कडून मात्र तातडीने कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले.गेल्या तीन ते चार तासापासून या जलवाहीनीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.याबद्दल स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com