जाहिरात

VIDEO: 'मराठी नही है तो क्या करे?' मराठी तरुणाला स्टेशन मास्तरने 3 तास डांबले, भाईंदर स्थानकात मुजोरी

रेल्वे स्थानकावर मराठी भाषेतून उद्घोषणा होत नसल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणालाच तब्बल तीन तास डांबून ठेवल्याच्या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

VIDEO: 'मराठी नही है तो क्या करे?' मराठी तरुणाला स्टेशन मास्तरने 3 तास डांबले, भाईंदर स्थानकात मुजोरी

मनोज सातवी, भाईंदर

Mira Bhayandar Marathi language Controversy:  राजधानी मुंबईमध्ये मराठी भाषावाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परप्रांतियांकडून मराठीचा अपमान होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशातच आता महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार मुंबई शेजारच्या मीरा भाईंदरमधून  समोर आला आहे. रेल्वे स्थानकावर मराठी भाषेतून उद्घोषणा होत नसल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणालाच तब्बल तीन तास डांबून ठेवल्याच्या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

'मराठी नहीं तो क्या करे?'

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईशेजारच्या मीरा भाईंदरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.  रेल्वे स्टेशनवर मराठी भाषेतून उद्घोषणा का करत नाही असा जाब विचारणाऱ्या मराठी तरुणावरच मुजोरी करण्यात आली. त्या ठिकाणी असलेल्या स्टेशन मास्तरने या मराठी तरुणाला तब्बल तीन तास आपल्या दालनात डांबून ठेवले.

Mumbai Rain: नववर्षाच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी! मुंबईत जोरदार पाऊस, कुठे कुठे सरी बरसल्या?

मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनवर ३० डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेमधूनच येणाऱ्या, जाणाऱ्या ट्रेनची उद्घोषणा केली जात होती. ही गोष्ट त्याठिकणी असलेल्या जिगर पाटील या तरुणाला खटकली. याबाबतच त्याने जाब विचारला. फक्त हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य का देता? मराठीची गळचेपी का करता असा सवाल या तरुणाने केला होता. त्यासाठी स्टेशन मास्तर बिपीन सिंग यांची भेट घेतली होती.

मराठी तरुणाला 3 तास डांबून ठेवलं! 

 या मराठी तरुणाने स्टेशन मास्तरकडे तक्रार वहीसुद्धा मागितली. तेव्हा संतापलेल्या स्टेशन मास्तरने 'मराठी नही है तो हम क्या करेंगे? असा उलटा सवाल केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रेल्वे पोलिसांना बोलवा. थांब तुला दाखवतो अशी धमकीही दिली. त्यानंतर या मराठी तरुणाला त्याने आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच त्या तरुणाला सोडवायला तात्काळ मराठी एकीकरण समिती शिलेदार प्रमोद पार्टे, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे यांच्यासह तात्काळ स्थानकावर धडक दिली आणि जाब विचारला. जिगर पाटील रेल्वेने प्रवास करत नव्हते, फक्त तक्रार करण्यासाठी आले होते; तरीही सूडबुद्धीने टीसी बोलावून २६० रुपयांचा खोटा दंड ठोठावला.असा आरोप मराठी एकीकरण समितीच्या प्रमोद पार्टे यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकाराने मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

VIDEO: नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने! मंदिरांमध्ये गर्दी... मुंबई ते दुबई कसं झालं सेलिब्रेशन? पाहा व्हिडिओ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com