जाहिरात

TET पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात, गुंगारा देणाऱ्या साथीदारालाही पकडलं, मोठे खुलासे समोर

टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्तासह त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकूला अखेर एक महिन्यानंतर पटना येथून अटक करण्यात आली आहे.

TET पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात, गुंगारा देणाऱ्या साथीदारालाही पकडलं, मोठे खुलासे समोर
TET Paper Leak Main Culprits Arrested

भुपेंद्र अंबावणे, प्रतिनिधी 

TET Paper Leak Latest News : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्तासह त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकूला अखेर एक महिन्यानंतर पटना येथून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात भिवंडी पोलिसांना यश मिळालं आहे,अशी माहिती भिवंडी परिमंडळचे पोलीस उपायुक्त डॉ.पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विजय मराठे,सचिन सांगळे उपस्थित होते.आत्तापर्यंत भिवंडी पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.यामध्ये बिजेंद्र गुप्ताची पत्नी सुमन कुमारी गुप्ता आणि साडू मिथुनकुमार सिंह यांचा तसेच प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आणि  काही जण तो विक्री करण्यासाठी राज्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यामुळे परीक्षा होण्याआधीच पोलिसांनी 27 जून रोजी तीन जणांना अटक केली आणि त्यांच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यानंतर याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याचा खुलासा झाला. यात बिजेंद्र गुप्ता हा या पेपरफुटीचा मास्टरमाईंड आरोपी असल्याचे समोर आले होते.त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोध घेण्यासाठी वेगवगेळे पथक बिहार,आग्रा, हरियाणा या भागात पाठवली. तांत्रिक विश्लेषण,गुप्त माहिती आणि विविध राज्यांतील तपास यंत्रणांशी समन्वय साधत पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. 

नक्की वाचा >> Abhijeet Dipke: पुण्यातून पत्रकारिता, USA मध्ये मास्टर्स, संभाजीनगरच्या अभिजित दिपकेंची संपूर्ण हिस्ट्री वाचा

बिहारच्या पटनात दोन्ही आरोपींना केली अटक

आरोपी बिहारमधील पटना येथे असल्याची माहिती अखेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगत बिजेंद्र कुमार गुप्ता व त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकूला ताब्यात घेतलं आणि आज शनिवारी त्यांना भिवंडीत आणलं. मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता हा फरार होता. त्याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.अखेर महिनाभराच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.यामुळे टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघडकीस येण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे.

नक्की वाचा >> PM Narendra Modi Video : पीएम नरेंद्र मोदींच्या 'या' व्हिडीओनं केला जागतिक विक्रम! जगभरात झालाय तुफान व्हायरल

महत्त्वाचे पेपर प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यासाठी पाठवले

आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ताचे आग्रा येथील महीम पत्रण या छापखान्यातील कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार होते.ज्या ज्या वेळी महत्त्वाचे पेपर या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यासाठी पाठवले जायचे, त्या त्या वेळी ठराविक रक्कम ठरवून मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता हा छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार करायचा. त्यांना इतर आमिष दाखवून पेपर विकत घ्यायचा, अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी या पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात आणखी  आरोपी समाविष्ट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दोन्ही आरोपींना सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com