Jayakwadi Dam Emergency gates opened : 13 सप्टेंबरपासून जायकवाडी धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणाच्या संपूर्ण 27 दरवाजामधून तब्बल 1 लाख 13 हजार 184 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यापूर्वी जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने उरलेले नऊ आपत्कालीन दरवाजे देखील पहाटे पाच वाजता उघडण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच नाशिकनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.95 असून धरणातून यावर्षी पहिल्यांदाच एक क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain : पुढचे 2 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अलर्ट; कोणत्या जिल्ह्यांना धोका?
धरण प्रशासनाची माहिती...
आज दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी ०६:३० ते ०७:०० या वेळेत जायकवाडी धरणाचे द्वार क्र १० ते २७ असे एकूण १८ (आपत्कालीन द्वार) दरवाजे ०.५ फूट उचलून ४.५ फूट पर्यंत उघडण्यात आले असून गोदावरी नदी पात्रात एकूण १८ (नियमित) व ०९ (आपत्कालीन) गेटमधून १०३७५२ + ९४३२ म्हणजेच ११३१८४ क्युसेक विसर्ग सुरू राहील.