Satara Doctor Death प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने अखेर...

सातारा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. महिला डॉक्टरने हातावर दोघांची नावं लिहून आत्महत्या केली. आपल्या चारपानी सुसाइड नोटमध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टरने बलात्काराचा आरोप केलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि सहआरोपी प्रशांत बनकर याला अटक केली होती. (Police Sub-Inspector Gopal Badne surrenders)


हातावर लिहिली सुसाइड नोट...

सातारा जिल्ह्यातील 28 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह गुरुवारी रात्री हॉटेलच्या एका खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. बीड जिल्ह्यात राहणारी आणि फलटणच्या एका सरकारी रुग्णालयात तैनात होती. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली. ज्यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर बलात्काराचा आरोप केला आहे. तर सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर तिला मानसिकदृष्ट्या त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. 

आरोपी पोलीस उपनिरीक्षक अटकेत...

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला शनिवारी रात्री उशीरा अटक केली. यापूर्वी फलटण पोलिसांच्या एका टीमने सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर याला अटक केली. सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी सांगितलं की, पोलीस उपनिरीक्षक बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आले आणि आत्मसमर्पण केलं. दुसरीकडे पीडितेला मानसिक छळ आणि आता आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या आरोप असलेले बनकर याला सातारा जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आलं. येथे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Satara Doctor Case: ''मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या!", साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या वडिलांची रडत-रडत मागणी

आरोपी पोलीस उपनिरीक्षक  काय म्हणाले?

रात्री उशिरा 1 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेला वैद्यकीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोर्टावर,  कायदेशीर गोष्टींवर आणि पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, असे वक्तव्य पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने केलं आहे.

Advertisement

शुक्रवारी रात्री प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली. तर पोलीस उपनिरीक्षक बदने फरार होता. सातारा पोलीस पंढरपूरहून पुण्यापर्यंत गोपाळ बदनेचा शोध घेत होते. मात्र, शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास बदने फलटण पोलिसांसमोर हजर झाला. आता पोलीस पुढील काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे.