BJP First List : मराठवाड्यात भाजपचे 16 उमेदवार घोषित, एक जागा मात्र वेटिंगवर

Marathwada News : यंदा भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप मराठवाड्यात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यात बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही.  

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एका ठिकाणी मात्र भाजपने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. गेल्यावेळी भाजपने मराठवाड्यात 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते. 

यंदा भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप मराठवाड्यात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यात बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही.  

(नक्की वाचा-  BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)

गेल्यावेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(नक्की वाचा- काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे मविआमध्ये टोकाचे मतभेद? शरद पवार गट-ठाकरे गट वेगळी बैठक घेण्याची शक्यता)

मराठवाड्यातील भाजप उमेदवार

  1. फुलंब्री - अनुराधा चव्हाण 
  2. औरंगाबाद पूर्व -  अतुल सावे 
  3. गंगापूर - प्रशांत बंब 
  4. किनवट - भीमराव केराम 
  5. नायगाव - राजेश पवार 
  6. मुखेड - तुषार राठोड 
  7. हिंगोली - तानाजी मुटकुळे 
  8. जिंतूर - मेघना बोर्डीकर 
  9. परतूर - बबन लोणीकर 
  10. बदनापूर - नारायण कुचे 
  11. भोकरदन - संतोष दानवे 
  12. केज - नमिता मुंदडा 
  13. निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर
  14. औसा - अभिमन्यू पवार 
  15. तुळजापूर- राणा जगजितसिंह पाटील 
  16. भोकर - श्रीजया चव्हाण
  17. गेवराई- अद्याप घोषित नाही

पाहा VIDEO