'शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब', दीड महिन्यात.... भाजपा नेत्याची जोरदार टीका

भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. शरद पवार म्हणजे मिनी औरंग्या आहे, अशी टीका पडाळकर यांनी केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. शरद पवार म्हणजे मिनी औरंग्या आहे, अशी टीका पडाळकर यांनी केली आहे.  आहिल्यादेवी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही जणांनी अहमदनगरचे नामकरण करु नये, अशा घोषणा दिल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अहमदनगरला अहिल्यानगर करण्यास पवारांच्या उपस्थितीमध्ये विरोध करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पडाळकर यांनी ही टीका केली आहे.  

माढा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये आज (सोमवार, 30 सप्टेंबर) गोपीचंद पडाळकर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पडाळकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दीड महिन्यानंतर...

'आता शरद पवार यांचे चिचुके विकले जाणार नाही. उंदीर माजला म्हणून बैलगाडी ओढू शकत नाही. आज अनेक जण तुतारीकडे जात आहेत पण पवार बिनबुडाचे गाडगे आहे. दीड महिन्यात कुठे पक्ष विसर्जित होईल सांगता येत नाही,' अशी टीका पडाळकर यांनी केली. 

आदिवासी नेत्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये. मूठ भर आदिवासी नेत्यांनी गोर गरीब आदिवासींची संख्या दाखवून आज पर्यंत लाभ घेतला. अनुसूचित जमातीत वर्गीकरण करून आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 

( नक्की वाचा : '....तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल', भाजपा आमदार पडळकरांची जीभ घसरली )
 

सुप्रिया सुळेंनाही केलं होतं लक्ष्य

पडाळकर यांनी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांना टार्गेट करण्याची ही पहिलीच घटना नाही. त्यांनी यापूर्वी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण असल्याची टीका केली होती.  लहानपणापासून शरद पवारांकडून सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. त्यामुळे लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेक. अजित पवारांनाही सहानुभूती दाखावयाची नाही, असं सुप्रिया सुळे बोलतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत, आणि सुप्रीय सुळे स्वत:मधील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहेत, अशी टीका पडाळकर यांनी यापूर्वी केली होती. 
 

Topics mentioned in this article