Bhimashankar Temple: मंदिर बंदचा निर्णय धाब्यावर! निशिकांत दुबेंसाठी भीमाशंकरचे दरवाजे उघडले; भाविकांचा संताप

मंदिर बंदचा निर्णय असताना झारखंडमधील भाजपा खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार,पुणे:

MP Nishikant Dubey visited Bhimashankar Temple: मुंबई आणि मराठी भाषेवरुन ठाकरे बंधुंना डिवचणाऱ्या भाजप खासदाराने घेतलेल्या व्हीआयपी दर्शनावरुन नवा वाद उभा राहिला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदि  सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र मंदिर बंदचा निर्णय असताना झारखंडमधील भाजपा खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या खासदारासाठी नियम धाब्यावर 

समोर आलेल्या माहितीनुसार,  शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी 2 वाजता दुबे कुटुंबीय आणि त्यांचे  नातेवाईक हेलिकॉप्टरने येऊन त्यांनी विशेष दर्शन घेतल्याने प्रशासनाच्या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भीमाशंकर मंदिराच्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे मंदिर ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. 

Advertisement

Pune News: "कोण आहे फावड्या शेठ?" शहरभर लागलेल्या बॅनरची पुण्यात चर्चा

अलिकडेच महाशिवरात्री उत्सवाला सुद्धा  भाविकांना मंदिर बंदच होते. अगदी पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी मज्जाव केला होता. मात्र थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासकीय नियम पायदळी तोडून मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली आहे. भाजप खासदारांच्या या व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी हात झटकले 

याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले आहे. "प्रशासनाकडून दर्शनासाठी कोणतीच अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. या घटनेबद्दल मला कोणतीही माहिती नाही" असे सांगत त्यांनी या प्रकरणापासून हाच झटकले आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने नेमक्या कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतलाय  असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 खासदार डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड मधील गोड्डा मतदारसंघाचे खासदार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती मानले जातात. निशिकांत दुबे त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात चर्चेत राहिलेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्यांनी राज ठाकरे आणि मराठी अस्मितवर टीका करताना मराठी लोकांना 'पटक पटक कर मारेंगे' असे वादग्रस्त विधान करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. अशा वादग्रस्त नेत्यासाठी भीमाशंकर मंदिरात मात्र सर्व नियम पायदळी तुडवल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Pune News: ज्यामुळे कुस्ती सोडली, ती जखम बळावली, मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; पुण्याच्या खासदारांना झालंय काय?