दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठकांचा सपाटा, मविआला शह देणारी भाजपची रणनिती तयार

भाजपकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. अशात, बैठकांचा सिलसिला पार पडताना दिसतोय. या बैठकी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्रात महायुतीला लोकसभेत अपयश आल्यानंतर भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोअर कमिटीची शुक्रवारी रात्री 8 ते मध्यरात्री 1 पर्यंत एक बैठक पार पडली. भाजपकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. अशात, बैठकांचा सिलसिला पार पडताना दिसतोय. या बैठकी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 


लोकसभेतील सुमार कामगिरीनंतर भाजपात वेगानं बैठकांचा सिलसिला घडताना दिसतोय. दिल्लीतील झालेल्या बैठकीनंतर राज्यातील भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पियुष गोयल, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे हे उपस्थिती होते. मविआला शह देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्राथमिक ब्लूप्रिंट तयार केली जाणार आहे. त्यासाठी आणखी बैठका पार पडणार असल्याची माहिती आहे. सोबतच, विधान परिषदेसाठी देखील भाजप जोर लावताना दिसत असून नावांच्या  निश्चितीसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ढाचा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याच बरोबर लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठीभाजपकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. विरोधकांनी भाजप विरोधी तयार केलेल्या मतालाही चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. याबरोबर नव्या योजनांसाठी भाजप आग्रही असणार आहे.

लोकसभेत मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका बसताना दिसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना विशेष काळजी घेतली जाणार आहे. सोबतच, मराठ्यांसाठी सरकारनं सुरु केलेल्या योजनांचा प्रचार देखील होताना दिसेल. विदर्भात देखील कुणबी मराठा, ओबीसी वर्गाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे.

Advertisement

भाजप नेत्यांकडून एकसंघ होत निवडणुकांना सामोरे जाण्याच्या सूचना भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. अशात, विधान परिषदेसोबतच विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जावं याचा रोड मॅप भाजपकडून तयार केला जात आहे.

Advertisement