Solapur News: स्मशानभूमीत 'रात्रीस खेळ चाले'; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pandharpur news: नातेपुते गावातील रहिवाशांनुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते. मात्र सातत्याने अशा वस्तू दिसत असल्याने जादूटोण्यासारखे प्रकार नातेपुते सुरू असल्याचे पुढे येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

माळशिरस तालुक्यातील नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या वेळी आघोरी प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आले आहेत. जळत्या चितेच्या शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू सुया आणि काही व्यक्तींचे फोटो आढळून आले. त्यामुळे माळशिरस गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

नातेपुतेच्या वैकुंठ स्मशानभूमी काळया बाहुल्या नारळ सुया लिंबू दारूच्या बाटल्या आणि काही व्यक्तींचे फोटो, तसेच कवाळ, कोंबड्या अशा गोष्टी मध्यरात्रीच्या वेळी कुणीतरी ठेवल्याचे आढळून आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जळत्या चितेजवळ या गोष्टी ठेवल्या गेल्या. यामध्ये चितेमधील काही अवशेष देखील गायब असल्याचे गावकरी सांगत आहेत. 

(नक्की वाचा-  साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)

नातेपुते गावातील रहिवाशांनुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते. मात्र सातत्याने अशा वस्तू दिसत असल्याने जादूटोण्यासारखे प्रकार नातेपुते सुरू असल्याचे पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून नातेपुते पोलिसांच्या वतीने आघोरी कृत्य करून समाजात भीतीचे वातावरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे. तर अशा वस्तू स्मशानभूमीत ठेवणाऱ्यांचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा-  Alibaug News: पुण्यानंतर आता कोकणातील पर्यटनस्थळावर दहशत; मुलांसाठी घराची दारं बंद, वन विभाग अलर्टवर)

मात्र एकंदर आघोरी कार्यसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी स्मशानभूमीत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली गेली. त्यामुळे नातेपुते गावात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी असे वातावरण भयमुक्त करण्याच्या दृष्टीने पोलीस मात्र ॲक्शन मोडवर आलेत.

Advertisement
Topics mentioned in this article