BMC Budget 2025 : मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी सादर करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता बीएमसी कमिश्नर भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यानंतर आज मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात (Mumbai Municipal Corporation Budget 2025-26) काय मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं.
- मुंबई महापालिकेचा 2025-26 चा 74427.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्के वाढ.
- गेल्या वर्षी 2024-25 च्या बजेटमध्ये 65 हजार 180 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.
- रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 5100 कोटी इतकी तरतूद
- मुंबई मलनि:सारण प्रकल्पासाठी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) अर्थसंकल्पीय अंदाजात 5545 कोटींची तरतूद
- सागरी किनारा रस्ता प्रकल्पाअंतर्गत उत्तर वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर लिंक रोडसाठी 5707 कोटींची तरदूत
- गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद
- मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी
- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार
- मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये
नक्की वाचा - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतीक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजना
- भायखळ्यातील राणी बागेत पेंग्वीन आणि वाघांनंतर जिराफ; झेब्रा; सफेद सिंह; जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणणार
- मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देणार.
- संजय गांधी नॅशनल पार् च्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारणार.
- लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत.
- काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.