जाहिरात

BMC Election 2026: अर्ज छाननीने टेन्शन वाढवले! मुंबईत तब्बल 'इतके' अर्ज बाद

निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

BMC Election 2026: अर्ज छाननीने टेन्शन वाढवले! मुंबईत तब्बल 'इतके' अर्ज बाद

BMC Election 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ साठी प्राप्‍त २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची  दिनांक ३१ डिसेंबर २०२५) छाननी करण्‍यात आली. यापैकी १६७ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली तर उर्वरित २ हजार २३१ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून वैध उमेदवारांना निवडणूक चिन्‍हांचे वाटप करण्‍यात येणार आहे.

Who is Pooja Dhananjay Jadhav: कोण आहे पूजा धनंजय जाधव? ज्यांना उमेदवारी दिल्याने भाजपप्रेमी भडकले

 मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: 

माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍यानुसार, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या २२७ नगरसदस्य निवडणुकीसाठी दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशनपत्र सादर करण्‍यास सुरुवात झाली. दिनांक ३० डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्‍यात आले होते. काल, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी म्‍हणजेच नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत एकूण मिळून २ हजार ५१६ अर्ज प्राप्‍त झाले होते. 

दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून सर्व २३ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयांमध्‍ये नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया राबविण्‍यात आली. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, अर्जाचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. ज्यांचे अर्ज परिपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज वैध ठरवून अंतिम करण्यात आले. त्यानुसार, २ हजार २३१ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर १६७ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली. 

नक्की वाचा: PMC Election 2026: उमेदवारीवरुन कलह! पठ्ठ्याने एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, पुण्यात काय घडलं?

2 जानेवारीला अर्ज माघे घेण्याची मुदत

छाननी प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. आता, उमेदवारी मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेदरम्यान आहे.  तर, शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍यात येणार आहे. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com