जाहिरात

Jayant Patil : "काही गद्दार..काही दिल्लीतील गुलाम..", जयंत पाटील यांचा घणाघात, "आता दोन्ही भाऊ.."

आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महासभा पार पडत आहे. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार)  ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

Jayant Patil : "काही गद्दार..काही दिल्लीतील गुलाम..", जयंत पाटील यांचा घणाघात, "आता दोन्ही भाऊ.."
Jayant Patil Shivaji Park Speech
मुंबई:

Jayant Patil On Thackeray Brothers :  मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजल्यापासून महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये सर्वात जास्त राजकीय संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीप्रमाणेच ठाकरे बंधूंनीही सभांचा धडाका उठवला आहे. आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवशक्ती सभा पार पडत आहे. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार)  ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले, त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार..तुम्ही दोघं एकत्रित आलात याचं शरद पवार साहेबांच्या वतीनं मी दोघांचं अभिनंदन करतो. आम्ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण टेलिव्हिजनवर बघायचो.तेच मैदान आहे, तीच शिवसेना आहे.मात्र शत्रू वेगळा आहे.काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले,"दोन्ही भाऊ एकत्र आले, त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार..तुम्ही दोघं एकत्रित आलात याचं शरद पवार साहेबांच्या वतीनं मी दोघांचं अभिनंदन करतो.आज पवार साहेबच येणार होते, पण त्यांना जमलं नाही. त्यांनी मला यायला सांगितलं. आम्ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण टेलिव्हिजनवर बघायचो.तेच मैदान आहे, तीच शिवसेना आहे.मात्र शत्रू वेगळा आहे.काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत.मला खात्री आहे की,मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे फार वर्षापूर्वी 19 जून 1966 ला याच शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापन झाली. त्यावेळी इथल्या कट्ट्यावर माझे नेते शरद पवार साहेबांनी त्यांचं भाषण ऐकलं होतं."

नक्की वाचा >>  "दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्री राम प्रभुंची..", CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, काय म्हणाले?

"मुंबईकरांच्या हितासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी.."

"दोघांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे कायमचे राहिले.वेगवेगळ्या पक्षात जरी असले,तरी मुंबईकरांच्या हितासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे.ही भावना महाराष्ट्रात पवार साहेबांनी कायम बाळगली. हे मैदान नुसतं मैदान नाही,हे मैदान स्वाभिमानाचं मैदान आहे.आपल्या अभिमानाचं मैदान आहे.भावनेची नाळ जोडणारं हे मैदान आहे.याच मैदानावर ज्यावेळी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली.त्यावेळी त्यांनी पक्षाच्या स्थापनेची सुरुवात याच मैदानावरून केली. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. त्याचा राग काहिंच्या मनात आजही आहे.हे विसरू नका",असंही जयंत पाटील म्हणाले.

नक्की वाचा >>  NDTV Power Play Conclave : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! "कोस्टल रोडला टोल नसणार", राहुल शेवाळेंचं मोठं विधान!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com