पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation Election 2026) पहिले युती, आघाडीवरून आणि नंतर जागावाटपावरून बराच वाद झालेला पाहायला मिळाला. पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपने युती व्हावी यासाठी जोरबैठका केल्या, मात्र ही युती होऊ शकली नाही. भाजपने पुण्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेंची शिवसेनाही पुण्यातील सगळ्या म्हणजेच 165 जागांवर लढणार असल्याचे कळते आहे. 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची अखेरची तारीख होती. पुण्यामधील प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा धनंजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फुलेनगर-नागपूर चाळ परिसरातून पूजा धनंजय जाधव या भाजपच्या तिकीटावर उभ्या आहेत. त्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील अनेकजण नाराज झाले असून सोशल मीडियावरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
नक्की वाचा: PMC Election 2026: उमेदवारीवरुन कलह! पठ्ठ्याने एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, पुण्यात काय घडलं?
पूजा जाधव यांच्या उमेदवारीला का होतोय विरोध?
पहलगाम इथे पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले होते. पूजा जाधव यांनी कश्मीरमध्ये जाऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आले हे साफ खोटे आहे. त्यांचा हा व्हिडीओ काँग्रेसच्या खासदारांसह अनेक नेत्यांनी शेअर केला होता आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. पूजा जाधव या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रामध्येही दिसल्या होत्या आणि त्यांचे राहुल गांधींसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते.
मास्टरस्ट्रोक....
— श्री संकासुर🚩 🇮🇳 (@shankar8891) December 31, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून हत्या झालेली नाही असे खोटे विधान करणार्या पुजा धनंजय जाधव हिला भाजपाची पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ ची उमेदवारी pic.twitter.com/7E3WTPAke1
पूजा धनंजय जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून बोलताना 'आरक्षण मागतोय तुमची बायको नाही' असे विधान केल्याचाही आरोप सोशल मीडिया पोस्टद्वारे केला जात आहे.
BJP Maharashtra गौतम गंभीर झाली काय ❓❓
— जनता बोले (@infotainment777) December 31, 2025
पुण्यातील पूजा जाधव घरी बसवा, जिहादी आतंकवादी च्या बाजूने बोलते. आरक्षण मागतोय फडणवीस ची बायको नाही असे म्हणत होती. हे सहन केले जाणार नाही.
पुण्यातील लोकांत नाराजी आहे. एक naska आंबा पूर्ण पेटी खराब करतो 🔥🔥
जय हिंद 🚩
भाजपच्या केंद्रापासून राज्यापर्यंतच्या बड्या नेत्यांवर टीका करणाऱ्या, पहलगाम हल्ल्यासंदर्भात वेगळी भूमिका घेणाऱ्या महिलेला उमेदवारी देणं भाजपप्रेमींना पटलेलं नाही. पूजा धनंजय जाधव यांच्या उमेदवारीबद्दल भाजपप्रेमी नाराज असून सोशल मीडियावर तशा आशयाच्या पोस्टही दिसू लागल्या आहेत.
विधानसभा निवडणूकही लढवली
पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याचे कळते आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूकही लढवली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. जुलै 2025 रोजी पूजा जाधव यांनी पुण्यामध्ये 5 हजार किलो चिकन मोफत वाटले होते, तेव्हापासून त्यांची चर्चा व्हायला सुरूवात झाली होती.
नक्की वाचा: BMC Election 2026: अख्ख्या वॉर्डात फक्त 2 उमेदवारी अर्ज.. भाजप- ठाकरे गटात लढत; 'या' प्रभागाची होतेय चर्चा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world