MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. आज शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधु मुंबईकरांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतील. दादर येथील शिवसेना भवनात दोन्ही ठाकरे महापालिका निवडणुकांचा वचननामा प्रसिद्ध करतील. या संयुक्त जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: ठाकरे बंधुंच्या मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा!
घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी
10 रुपयात जेवण आणि नाश्ता
नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांना सांभाळणारी पाळणाघरे
पाळीव प्राण्यासाठी दवाखाना
बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसाह्य योजना
मुंबई पालिकेतील अत्यावश्यक रिक्त पद भरणार
प्रत्येक वार्डात आजी आजोबा मैदान
700 चौ फुटापर्यत मालमत्ता कर माफ कचरा कर रद्द
महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही
दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यत ज्युनियर कॉलेज
मुंबई पब्लिक स्कुलचा दर्जा अत्याधुनिक करणार
मराठी शाळेत बोलतो मराठी हा हसत खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार
मुंबई महानगर पालिकेतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठं ग्रंथालय
मुंबई चं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय
रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ऍम्ब्युलन्स सेवा
उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील कंत्राटदाराकडून रस्त्याची 15 वर्षाची हमी घेतली जाईल
सांडपाणी प्रक्रिया करणारे मल निसारण प्रकल्प उभारणार
पाण्याला दर स्थिर ठेवून मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणार
फुटपाथ आणि मोकळ्या जागा
खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
महिला आणि विध्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग व्यवस्था
प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून वापरण्यायोग्य करणार
मुंबईतील नालेसफाई 12 महिने प्रक्रिया राबवणार
मुंबईतील नागरिकांना 100 युनिटपर्यत वीज मोफत
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: राहुल नार्वेकरांचं तत्काळ निलंबित करा, गुन्हा दाखल करा - उद्धव ठाकरे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं तत्काळ निलंबित करा, गुन्हा दाखल करा - उद्धव ठाकरे
नार्वेकर नायक चित्रपटातले अनिल कपूर असल्याच्या थाटात वावरत होते - उद्धव ठाकरे
निवडणुकीत दमदाटी करून बिनविरोध निवड करून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं - उद्धव ठाकरे
निवडणुक आयोग सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्याचं चित्र जनतेत जाऊ देऊ नका- उद्धव ठाकरे
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: शिवशक्तीचा वचननामा जनतेच्या चरणी सादर
सर्वांचे स्वागत... मला वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतयं. वीस वर्ष जेलमध्ये होते, आज त्यांचं स्वागत करुया असं वाटतयं. नवे शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय. सर्व आठवणी जुन्या शिवसेना भवनामधील आहेत. त्या सर्व रोमांचकारी आणि आनंददायी आहेत. त्या आठवणींबाबत इतक्या गोष्टी सांगता येतील की.. ७७ साली शिवसेना भवन झाले. त्याच साली जनता भवनाचे सरकार आले होते. तेव्हापासूनच्या आठवणी आहेत. राज ठाकरे:
संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करत आहोत. आदित्य ठाकरे- अमित ठाकरेंनी याआधी सांगितल्याच आहेत. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा:
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचे स्वागत
सन्माननीय राज ठाकरे यांचे २० वर्षांनी सेना भवनात आगमन झालेले आहे. मी माननीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे याचे चित्र दिसत आहे. सध्या सर्वकाही संयुक्त होत आहे.
आज शिवशक्ती महाराष्ट्रातल्या प्रमुख तीन पक्षांच्या आघाडीचा संयुक्त वचननामा प्रकाशित होत आहे. आदित्य ठाकरे- अमित ठाकरेंनी वचननाम्यावरती सविस्तर माहिती दिलेली आहे. आज पुन्हा त्याचे प्रकाशन होईल: संजय राऊत
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: ठाकरे बंधुंचा वचननामा! पत्रकार परिषदेला सुरुवात
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर हे पत्रकार परिषदेसाठी दाखल झाले आहेत.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: 20 वर्षानंतर राज ठाकरे सेना भवनात दाखल
उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरेही शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. २० वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे सेना भवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ठाकरे बंधु आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतील.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: राज ठाकरे शिवतीर्थावरुन रवाना, थोड्याच वेळात सेना भवनात जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावरुन सेना भवनाकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते शिवसेना भवनात दाखल होतील. तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे हे सेना भवनामध्ये जाणार आहेत.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: 'मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा', ठाकरे बंधुंची खास टॅगलाईन
मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा! अशा टॅगलाईनने ठाकरे बंधु आज आपला वचननामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन रवाना झाले असून सेना भवनात दोन्ही ठाकरे पत्रकार परिषद घेतील.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना..
आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होत असून उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानावरुन शिवसेना भवनाकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर करतील.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: त्यांचे जाहीरनामे कागदावरचं.. भाजपने ठाकरे बंधुंना डिवचले
मुंबई महानगरपालिका निवडणुकासाठी ठाकरे बंधुंचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. यावरुनच भाजपने मनसे- शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपचे सांगते ते करते. ठाकरेंचे जाहीरनामे कागदावरच असतात. आत्ताचाही कागदावरच असेल असा टोल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थावर मोठी घडामोड
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्याआधी मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: ठाकरे बंधुंच्या वचननाम्यापूर्वी मनसे नेत्यांची बैठक
ठाकरे बंधूंचा चचननामा जाहीर होण्यापूर्वी मनसे नेत्यांची शिवतीर्थावर बैठक पार पडत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: उद्धव ठाकरे करणार प्रचाराचा शुभारंभ.. आज शाखांना भेटी देणार
मुंबई महानगरपालिकांसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रचाराच्या तयारीला लागणार आहेत. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून शाखांना भेटी देणार आहेत. आज ते कांदिवली, बोरिवलीतील शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: ठाकरे बंधुंची युती! कोण किती जागा लढवणार?
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. मुंबईमध्ये 227 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक 165 जागांवर निवडणुका लढवणार आहे तर मनसे 52 जागांवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा देण्यात आल्या आहेत.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: भाजप करणार ठाकरे बंधुंच्या वचननाम्याची पोलखोल, अमित साटम घेणार पत्रकार परिषद
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज आपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करतील. आपल्या वचननाम्यामधून ठाकरे बंधु मुंबईकरांसाठी कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू वचननामा प्रसिद्ध होताच भाजपकडून त्याची पोलखोल होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे ठाकरे बंधुंच्या जाहीरनाम्याची पोलखोल करतील. अमित साटम दुपारी मुंबईत दादर वसंत स्मृती भवन कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.
Raj Thackeray- Uddhav Thackeray PC LIVE Update: राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधु मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करतील. शिवसेना भवनामध्ये ही पत्रकार परिषद होणार असून त्यासाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाणार आहेत.
MNS Shivsena UBT Manifesto LIVE Update: ठाकरे बंधुंचा वचननामा आज ठरणार!
शिवसेना उद्धव ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचा संयुक्त वचननामा आज जाहीर होत आहे. ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा करतील.