जाहिरात

BMC Election 2026: मतदान केल्यास होणार मोठा फायदा, ऑफर अजिबात चुकवू नका

How to get a discount in Mumbai hotels after voting?: 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

BMC Election 2026: मतदान केल्यास होणार मोठा फायदा, ऑफर अजिबात चुकवू नका
मुंबई:

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (BMC Election 2026) उत्साह आता शिगेला पोहोचला असून, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखी योजना समोर आली आहे. येत्या 15 जानेवारीला ( BMC Election Polling Day) मुंबईकर जेव्हा आपला मतदानाचा हक्क बजावतील, तेव्हा त्यांना केवळ लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडल्याचे समाधानच लाभेलच शिवाय बार अँड रेस्टॉरटसह सामान्य हॉटेमध्ये खाल्ल्यास, जेवल्यास विशेष सवलतही (Restaurant Special Discounts) मिळणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील संघटना असलेल्या 'आहार' (AHAR) ने मतदारांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे.

नक्की वाचा: BMC Election 2026: मुंबई पालिकेचा दणका! 'त्या' कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; सहआयुक्तांची कठोर कारवाई

अनेकदा निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाचा टक्का नेहमीच चिंतेचा विषय असतो. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने मतदार मतदान करण्याऐवजी पिकनिकला जाणे किंवा घरी राहणे पसंत करतात. ही मानसिकता बदलण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 'आहार' संघटनेशी हातमिळवणी केली आहे. या उपक्रमांतर्गत, 15 जानेवारी 2026 रोजी जे नागरिक मतदान करतील आणि त्यांच्या बोटावर असलेली शाई हॉटेलमध्ये दाखवतील, त्यांना बिलावर विशेष सवलत दिली जाणार आहे. 'आहार' ही संघटना मुंबईतील सुमारे 8,000 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि परमिट रूम्सचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या मतदाराला या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या 'स्वीप' (SVEEP) उपक्रमाला यामुळे मोठे बळ मिळाले आहे. प्रशासनाने यापूर्वीच पथनाट्ये, फ्लॅशमॉब आणि शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. आता त्यात हॉटेल व्यावसायिकांनी उडी घेतल्याने मतदानाचे वातावरण अधिकच रंजक झाले आहे. आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी स्पष्ट केले की, हॉटेल क्षेत्राचा थेट संबंध लोकांशी येतो, त्यामुळे मतदानाची जाणीव करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

नक्की वाचा: Ladki Bahin Yojana Fact Check: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला 3000 रुपये मिळणार? जाणून घ्या सत्य

15 जानेवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांच्या मते, मतदान हा लोकशाहीचा कणा असून "मी समाजाचा जबाबदार घटक आहे" ही भावना रुजवणे आवश्यक आहे. मतदानाची शाई दाखवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला विशिष्ट सवलत देऊन, हॉटेल व्यावसायिक या प्रक्रियेत आपले योगदान देत आहेत. प्रशासनाच्या प्रयत्नांना व्यावसायिक संघटनांची जोड मिळाल्याने यंदा मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मोहिमेत केवळ हॉटेल संघटनाच नाही, तर आरटीओ आणि इतर सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मतदानाचे महत्त्व घराघरांत पोहोचवले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com