जाहिरात

Mumbai Water Storage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! धरणांमधील पाणीसाठ्याने चिंता वाढवली; धडकी भरवणारी आकडेवारी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. याचा थेट परिणाम तलावांमधील जलसाठ्यावर झाला

Mumbai Water Storage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! धरणांमधील पाणीसाठ्याने चिंता वाढवली; धडकी भरवणारी आकडेवारी

Mumbai Dam Water Level: जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यभरात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यंदा उशिरा सुरु झालेला मान्सून तसेच संपूर्ण जून महिन्यात पाऊस न पडल्याने राज्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. अशातच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने चिंता वाढवली आहे.

Rain Alert: पाऊस पुन्हा झोडपणार! पुढील 5 दिवस धोक्याचे; 16 जिल्ह्यांना अलर्ट; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा

मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी!

मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. याचा थेट परिणाम तलावांमधील जलसाठ्यावर झाला असून, मागील पाच दिवसांत मुंबईच्या एकूण पाणीसाठ्यात केवळ ०.८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पावसाची ही दडी मुंबई महानगरपालिकेसाठी चिंतेची बाब ठरत असून, भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. ​मिळालेल्या आकडेवारीनुसार, १३ जुलै रोजी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत १८ जुलैपर्यंत पाणीपातळीत नगण्य सुधारणा दिसून आली आहे. मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

मात्र तरी मोडक सागर आणि तुळशी या तलावांच्या पातळीत काहीशी घट झाली असल्याचे दिसून येते. पाऊस सक्रिय न राहिल्यास भविष्यात पाणीकपातीचे संकट ओढवू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून तलाव क्षेत्रातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा

तलाव        13 जुलै            18 जुलै 

भातसा        3,19,659        3,25,202
अपर वैतरणा    64,431            69,605
मध्य वैतरणा    85,085           88,006
मोडक सागर    1,03,964      99,840
तानसा        1,13,826         1,16,653
विहार        27,698             27,698
तुळशी        8,046             7,887

Shivsena News: ठाकरेंच्या बंडखोर खासदार गटाचे शिवसेनेत विलिनीकरण, लोकसभा अध्यक्षांनी दिली मान्यता

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com