हल्लीच्या जगात कुठे दुर्घटना घडली की लोकांना वाचवण्याऐवजी अनेकजण फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी पुढे, पुढे करतात. अशा या जगात किरण सूर्यवंशींसारखी काही माणसं आहेत जी पराकोटीचं धाडस दाखवत लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. किरण सूर्यवंशी हे भायखळा वाहतूक विभागात हवालदार म्हणून कामाला आहेत. त्यांचा एक फोटो मुंबई वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं पोलीस दलात कौतुक केलं जात आहे. एका महिलेवर चाकूने हल्ला करणाऱ्यावर झडप घालून त्याला जेरबंद करण्यासाठी किरण सूर्यवंशींनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ज्या महिलेवर हल्ला झाला होता, त्या महिलेची हल्लेखोरापासून सुटका झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करता आलं.
नक्की वाचा: 234 स्मार्टफोन्स ठरले 19 प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत; बस दुर्घटनेतील धक्कादायक खुलासा
काळाचौकी इथे प्रियकराने केला प्रेयसीवर जीवघेणा हल्ला
काळाचौकी इथे शुक्रवारी एका प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला होता. दहा वर्षांपासूनचे असलेले प्रेमसंबंध तुटल्यामुळे तो भडकला होता. प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी त्याने तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला होता. मनीषा यादव (24) असं महिलेचं नाव असून तिच्यावर मुंबईत भरदिवसा चाकूने वार करण्यात आले. सोनू बराय असं तिच्या प्रियकराचं नाव असून त्याने केलेल्या हल्ल्यातून मनीषाने कसाबसा जीव वाचवत एका नर्सिंग होमचा आधार घेतला. मात्र सोनूने तिचा पाठलाग करून तिथेही तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मनीषाचा मृत्यू झाला. मनीषाला भोसकल्यानंतर सोनूने स्वत:वरही वार करून जीवन संपवले.
नक्की वाचा: 5 महिन्यांपासून छळ, अखेर दुर्दैवी अंत! डॉक्टर तरुणीसोबत काय काय घडलं? A टू Z स्टोरी
वादामुळे मनीषाने सोनूपासून घेतली होती फारकत
सोनू बराय आणि मनीषा यादव हे दोघेही आंबेवाडी परिसरात राहात होते. साधारणपणे 8 ते 10 वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून सोनू मनीषाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता आणि यातून त्यांच्यात सारखी भांडणे व्हायला लागली होती. या त्रासाला कंटाळून मनीषा सोनूसोबत असलेले नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे भडकलेल्या सोनूने मनीषाला शुक्रवारी सकाळी भेटायला बोलावले होते. चर्चा करून तोडगा काढू असं म्हणत त्याने तिला भेटायला बोलावलं होतं.
नक्की वाचा: दिवाळीत घरी येणार होती, पण मृतदेह आला.. तरुणीच्या कुटुंबियांचा आक्रोश, अख्ख गाव सुन्न
किरण सूर्यवीशींचे धाडस
सोनू बराय याने मनीषा यादव हिच्यावर हल्ला केल्यानंतर तिला वाचवण्यासाठी ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी प्रयत्न केले होते. सोनू बराय याला दगड, पेव्हर ब्लॉक फेकून मारण्यात आले, मात्र बेभान झालेला सोनू कोणालाही जुमानत नव्हता. यावेळी, भायखळा वाहतूक विभागाचे शिपाई किरण सूर्यवंशी हे याच भागात एका कारवाईसाठी आले होते.
त्यांना या घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांनी नर्सिंग होमच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी सोनू बराय याच्यावर जीवाची पर्वा न करता झडप झातली आणि मनीषाला त्याच्या ताब्यातून सोडवले. मनीषाला जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.