जाहिरात

Phaltan Doctor Case: 5 महिन्यांपासून छळ, अखेर दुर्दैवी अंत! डॉक्टर तरुणीसोबत काय काय घडलं? A टू Z स्टोरी

Phaltan Doctor Death Case Inside Story: वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने अखेर या तरुणीने आयुष्य संपवलं. जून महिन्यापासुन सुरु असलेल्या या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे.

Phaltan Doctor Case: 5 महिन्यांपासून छळ, अखेर दुर्दैवी अंत! डॉक्टर तरुणीसोबत काय काय घडलं? A टू Z स्टोरी

Phaltan Female Doctor Death Case: पोलिस आणि राजकारणांच्या त्रासाला कंटाळून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने जीव दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुळची बीडची असलेल्या या डॉक्टर तरुणीने फलटणमध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. गेल्या पाच महिन्यांपासून या या डॉक्टर तरुणीचा छळ सुरु होता. वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने अखेर या तरुणीने आयुष्य संपवलं. जून महिन्यापासुन सुरु असलेल्या या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे. (Satara Doctor Death Case Update) 

आत्तापर्यंत काय काय घडलं? 

 १९ जून २०२५:  डॉक्टर तरुणीने फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बादणे आणि इतर अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या छळवणुकी आणि लैंगिक अत्याचाराबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, ही मोठी प्रशासकीय त्रुटी आता चौकशीखाली आहे.

 जून – ऑक्टोबर २०२५: या काळात डॉक्टर तरुणीवर सतत दबाव टाकण्यात आला. फलटण ग्रामीण पोलिसांकडून त्यांच्यावर “वैद्यकीय तपासात अडथळा आणला” असा आरोप करत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. पोलिस व आरोग्य विभागातील शवविच्छेदन प्रकरणांवरील मतभेदांमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या त्यांच्या पत्रांमध्ये त्यांनी स्पष्टपणे मानसिक छळ, नैराश्य व आत्महत्येच्या विचारांबाबत इशारा दिला होता.

२३ ऑक्टोबर २०२५:  भाऊबीजेच्या रात्री सुमारे १०:३० वाजता डॉक्टर तरुणी या फलटणमधील त्यांच्या हॉटेल रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत सापडल्या. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयीन कर्तव्ये असल्यामुळे त्या नेहमी हॉटेलमध्ये राहायच्या.

 २३ ऑक्टोबर २०२५: त्यांच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीत PSI गोपाळ बादणे (पाच महिन्यांपासून लैंगिक व मानसिक छळाचे आरोप) आणि प्रशांत बंकर (सामान्य नागरिक, मानसिक छळाचा आरोप) यांची नावे होती. या चिठ्ठीतील मजकूर आणि घटनेची पार्श्वभूमी पाहता त्यांना झालेल्या सततच्या छळामुळेच आत्महत्या झाल्याचे स्पष्ट होते.

Satara Doctor Suicide Case: आरोपी PSI बदनेचं शेवटचं लोकेशन सापडलं, पोलिसांकडून शोध सुरू

 २३–२४ ऑक्टोबर २०२५: कुटुंबीय आणि सहकारी डॉक्टरांचा आरोप आहे की, संवेदनशील शवविच्छेदन प्रकरणांमध्ये दस्तऐवज बदलण्याचा दबाव त्यांच्यावर आणला जात होता. यामुळेच त्यांची मानसिक अवस्था आणखी बिघडली होती.

२४ ऑक्टोबर २०२५: सातारा पोलिसांनी PSI गोपाळ बादणे (बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि प्रशांत बंकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार PSI बादणे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आणि सखोल चौकशी व कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.

२४–२५ ऑक्टोबर २०२५: एका आरोपीस अटक: या प्रकरणी प्रशांत बनकर यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी गोपाळ बदणे अद्याप फरार आहे.  शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना: मृतदेहाचे शवविच्छेदन करुन तो बीडला पाठवण्यात आला आहे. तसेच आत्महत्येच्या चिठ्ठीचे फॉरेन्सिक परीक्षण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणातील पूर्वीच्या तक्रारींवर झालेल्या निष्क्रियतेबाबत चौकशी व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

ते खासदार कोण? 

या सर्व प्रकरणात खासदारांसह त्यांच्या दोन पीएनेही फोनवरुन संवाद साधल्याचा गंभीर आरोप डॉक्टर तरुणीने केला आहे. या नेत्याचे नाव लिहले नसल्याने विद्यमान की माजी खासदार असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबतच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप  नेते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे, खासदारांचे राजेंद्र शिंदे आणि नागटिळक हे दोन PA आहेत, ज्यांचा या प्रकरणात हात असल्याचा थेट आरोप केला आहे. 

IKEA ची पु्ण्यात एन्ट्री; मोठी जागा भाड्याने घेतली; भाडं ऐकून थक्का व्हाल!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com