जाहिरात

Satara Doctor Case: दिवाळीत घरी येणार होती, पण मृतदेह आला.. तरुणीच्या कुटुंबियांचा आक्रोश, अख्ख गाव सुन्न

Phaltan Female Doctor Death Case Update: या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Satara Doctor Case: दिवाळीत घरी येणार होती, पण मृतदेह आला.. तरुणीच्या कुटुंबियांचा आक्रोश, अख्ख गाव सुन्न

आकाश सावंत, बीड:

Satara Female Doctor Suicide Case News:   'रक्षकच भक्षक' बनल्याची एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आरोग्य आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Phaltan Doctor Death Case News)

आत्महत्या करण्यापूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली असून, त्यामध्ये त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार (Rape) केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर महिलेने केला आहे. तर, पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास (Mental Harassment) दिल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Satara Doctor Case: मॅडम, असा रिपोर्ट द्या...' महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी खळबळजनक खुलासा, ते पत्र समोर

हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण, कुटुंबियांचा आक्रोश... 

आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी ही मुळची बीडची होती. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी सरकारी नोकरी मिळवली होती. कुटुंबाचा आधार असलेल्या या लेकीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृत्यू झालेली तरुणी दिवाळीनिमित्त घरी येणार होती. मात्र तिचा मृतदेहच आल्याने कुटुंबीय अक्षरश: हादरुन गेले असून त्यांचा  आक्रोश सर्वांचेच काळीज पिळवटून टाकत आहेत. 

दरम्यान,  संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आता आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे 
यापूर्वी डॉक्टर महिलेने आपल्या नातेवाईकांना उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विभागात भ्रष्टाचार (Corruption) होत असल्याची माहिती दिली होती. आपल्याला मोठा त्रास होत असल्याची कैफियतही त्यांनी नातेवाईकांकडे मांडली होती, असे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Islampur Rename: सांगलीतील इस्लामपूर शहराचं नाव बदललं; केंद्र सरकारची 'या' नावाला मान्यता

हॉटेलमध्ये संपवलं आयुष्य...

संबंधित महिला डॉक्टरमागे काही दिवसांपूर्वी फलटण ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर चौकशीचा फेरा सुरू होता. पोलिसांनी त्यांच्या विरोधात वैद्यकीय तपासणीस अडथळा आणल्याची नोंद केली होती. या प्रकरणानंतर डॉ. मुंडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी लेखी नोंद केली होती. मात्र या तक्रारीनंतरही परिस्थिती अधिक चिघळत गेली. अखेर काल रात्री फलटणमधील हॉटेल मधुदीप येथे त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण फलटण हादरले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com